ज्येष्ठागौरी आवाहन आज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

नागपूर - महालक्ष्मी म्हणजेच ज्येष्ठागौरीच्या आवाहनासाठी सर्वोत्तम असा काळ मंगळवारी (ता. २९) सकाळी ९.३० ते दुपारी २ किंवा दुपारी ३.३० ते सायंकाळी पाच वाजतादरम्यान आहे. अनुराधा नक्षत्र असल्याने कुळाचाराप्रमाणे पूजा अर्चना करावी, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली.

महालक्ष्मी हे तीन दिवसांचे व्रत नक्षत्रप्रधान असल्याने अनुराधा, ज्येष्ठा व मूळ नक्षत्रावर केले जाते. बुधवारी (ता. ३०) संपूर्ण दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र आहे. या दिवशी महालक्ष्मीचे पूजन आणि महानैवेद्य करावा. गुरुवारी (ता. ३१) दिवसभर मूळ नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर  कुळाचाराप्रमाणे महालक्ष्मीचे विसर्जन करावे, असे डॉ. वैद्य म्हणाले. यावर्षी गौरी कोंबड्यावर बसून येत असून, भात भक्षण करीत आहे. तिने तांबडे वस्त्र परिधान केले असून, हातात तलवार घेतली आहे. कस्तुरीचा तिलक लावलेला आहे. ती दक्षिणेकडे पाहत आहे. भाद्रपदातील महालक्ष्मीच्या वेळी अशौच असेल तर गौरी आवाहन करू नये. काही ठिकाणी अशा परिस्थितीत अश्‍विन महिन्यात गौरीपूजन करता ते युक्त नाही. अशाप्रसंगी घरी त्यावर्षी महालक्ष्मी व्रत करू नये, असा धर्मशास्त्रात उल्लेख असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.

Web Title: nagpur news gauri