ग्रामसेवकाकडून अधिकाऱ्याला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

वानाडोंगरी - काटोल तालुक्‍यात हिगण्यावरून बदली झालेल्या ग्रामसेवकाने पंचायत विस्तार अधिकारी विलास लोखंडे यांना मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. ६) हिंगणा पंचायत समिती कार्यालयात घडली. या प्रकरणाची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. उद्या सर्व ग्रामसेवक, पंचायत समितीचे सर्व कर्मचारी व विस्तार अधिकारी एकत्र बसून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून निर्णय घेतील, असे गटविकास अधिकारी महेंद्र जुवारे यांनी सांगितले.

हिंगण्यावरून बदलून गेलेले ग्रामसेवक सचिन वाटकर एका पत्रकाराला सोबत घेऊन कक्षात आले. परंतु कर्मचारी नशेत असल्याने विस्तार अधिकाऱ्यांनी बाहेर जायला सांगितले. काही वेळानंतर वाटकर पुन्हा विस्तार अधिकारी विलास लोखंडे यांच्या टेबलाजवळ गेले त्यांना मारहाण केली. 

ग्रामसेवक सचिन वाटकर यांनी ज्या ठिकाणी काम केले, त्या सर्व ग्रामपंचायतची चौकशी करण्यासाठी पंचायत समिती पदाधिकारी मासिक सभेत एकमताने ठराव घेऊन पदाधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. परंतु नंतर कुठे माशी शिंकली कुणास ठाउक. नंतर ही चौकशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्तरावर करण्याचा ठराव घेण्यात आला होता. 

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काटोलचे गटविकास अधिकारी सुनील माने यांच्या मार्गदर्शनात एक चौकशी समिती गठीत केली. सात दिवसात चौकशी करुन अहवाल देण्यात यावा, असे आदेशात असताना अजूनही या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली नाही. शेवटी हे प्रकरण मारहाणीपर्यंत पोहचले.

Web Title: nagpur news Gramsevak hit the officer

टॅग्स