उपराजधानीत पारा चाळिशीपार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

नागपूर - एप्रिल महिना जसजसा जवळ येत आहे, तसतसे उन्हाचे चटके तीव्र होऊ लागले आहेत. नागपूरसह अनेक शहरांमध्ये बुधवारी पाऱ्याने चाळिशी पार केली. या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहे. 

मध्य भारतातील विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये सध्या कोरडे वातावरण आहे. वातावरणाचा सर्वाधिक प्रभाव विदर्भात जाणवत आहे. अनेक शहरांमध्ये पारा सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांनी चढला. नागपुरात मंगळवारी तापमानाने प्रथमच चाळिशी गाठली होती. त्यात आज किंचित वाढ होऊन पारा या मोसमातील सर्वाधिक 40.9 अंशांपर्यंत चढला. वर्धा (41.9 अंश सेल्सिअस) येथे विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. याशिवाय ब्रह्मपुरी (41.8 अंश सेल्सिअस), अकोला (41.5 अंश सेल्सिअस), चंद्रपूर (41.2 अंश सेल्सिअस), यवतमाळ (41 अंश सेल्सिअस), गडचिरोली (41 अंश सेल्सिअस) येथेही उन्हाचे चटके अधिक जाणवले. या आठवड्यात कमाल तापमानात आणखी वाढ होऊन 43 अंशांपर्यंत जाऊ शकते, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

Web Title: nagpur news high temperature