अंबाझरी, सदरमधील हुक्‍का पार्लरवर छापे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

नागपूर - धरमपेठमधील फ्यूजन कॅफे ॲण्ड लाउन्झ पार्लर येथे पोलिस उपायुक्‍त नीलेश भरणे यांनी छापा घातला. या छाप्यात अनेक लहान मुले आणि मुली हुक्‍का पिताना आढळले. पार्लरमधून हुक्‍का पॉट, तंबाखू आणि हुक्‍का साहित्य जप्त करण्यात आले. पार्लर मालक आरोपी मयंक गौरीशंकर अग्रवाल (वय २७, रा. पौर्णिमा सदन, इतवारी) याला ताब्यात घेतले. दुसरा छापा सदरमधील उत्कर्ष निर्माण कॉम्प्लेक्‍स मंगळवारी बाजार येथील पाईपिंग ड्रिंक्‍स कॅफे या हुक्‍का पार्लरवर घातला. पार्लरचा संचालक रोहित जॉर्ज जेबीयर (वय २३, शीतला माता मंदिर, राजनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

Web Title: nagpur news hookah parlour crime

टॅग्स