मनोरुग्ण मनीषा मारते उपचारासाठी खेटा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दर दिवसाला मनोरुग्णांना उपचारासाठी आणले जाते. नुकतेच गंभीर रुग्ण असलेल्या २२ वर्षीय मनीषाला दर दोन दिवसांनंतर मेडिकलमध्ये उपचारासाठी आणले जाते. दोन दिवसांत मेडिकलमधून सुटी दिली जाते, अशाप्रकारे मनोरुग्णांना यातना देण्याचा प्रकार येथे सुरू आहे.

नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दर दिवसाला मनोरुग्णांना उपचारासाठी आणले जाते. नुकतेच गंभीर रुग्ण असलेल्या २२ वर्षीय मनीषाला दर दोन दिवसांनंतर मेडिकलमध्ये उपचारासाठी आणले जाते. दोन दिवसांत मेडिकलमधून सुटी दिली जाते, अशाप्रकारे मनोरुग्णांना यातना देण्याचा प्रकार येथे सुरू आहे.

मेडिकलमध्ये गंभीर रुग्णांना उपचारासाठी आणल्यानंतर किमान आठ ते दहा दिवस भरती ठेवून त्यांच्यावर योग्य उपचार व्हावे. परंतु नुकतेच मनीषाला दोनवेळा भरती केले. पुन्हा सुटी दिली. अशाप्रकारे तिला त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. मनोरुग्णांना असह्य वेदना देण्यात मनोरुग्णालय मागे नाही. साधा ताप, खोकला असलेल्या मनोरुग्णांना उपचारासाठी मेडिकलमध्ये पाठवले जाते. हगवण लागल्यानंतर त्यांच्यावर कोणतेही उपचार न करता थेट मेडिकलमध्ये रवानगी केली जाते. मेडिकलमध्ये उपचारादरम्यान तासन्‌तास मनोरुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. तहानेने मनोरुग्णांचा जीव व्याकुळ होतो, भुकेची आग सहन न झाल्यामुळे मनोरुग्ण अक्षरशः रडतात. परंतु त्यांच्या या वागण्याकडे वेडा समजून दुर्लक्ष केले जाते. उपचारासाठी आलेल्या मनोरुग्णांवर चार ते पाच तास उपाशी राहण्याची पाळी येते. दोन दिवसांपूर्वी मनीषाला वॉर्ड क्रमांक २७ मध्ये भरती करण्यात आले. यानंतर पुन्हा सुटी दिली, हा प्रकार गेल्यात पंधरा दिवसांपासून सुरू आहे. गेल्या आठवडाभरापासून मेडिकलमध्ये उपचारासाठी आणलेल्या मनोरुग्ण महिलेस पाच तास उपचारासाठी वेठीस धरले जात असल्याची माहिती पुढे आली. तसेच उपचारादरम्यान मनोरुग्णांना सीटी स्कॅन, एक्‍स रे किंवा सोनोग्राफी काढण्याचा सल्ला दिला जातो. मेडिकलच्या रेडिओलॉजी विभागात सामान्य रुग्णांप्रमाणे मनोरुग्णांनादेखील सीटी स्कॅन, एक्‍स रे किंवा सोनोग्राफी काढण्यासाठी चार ते पाच तासांची प्रतीक्षा करावी लागते. मनोरुग्णांसाठी स्वतंत्र सोय नाही. मनोरुग्णांसोबत अटेन्डट्‌स, परिचारिकाही उपाशी राहतात.

मनोरुग्णालयात व्हावेत उपचार 
मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मनोरुग्णांना नियंत्रणात आणण्यासाठी केवळ एक अटेन्ड्‌टस असते. मनोरुग्णाला उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांपर्यंत पोहोचवणे, विविध चाचण्या करण्यासाठी नेण्यासोबतच मनोरुग्णांचा जबाबदारीने सांभाळ करण्याचे काम एकाच ‘वॉर्ड बॉय’ला करावे लागते. साधा सर्दी, खोकला, ताप असलेल्या मनोरुग्णांना मेडिकलमध्ये आणले जाते. मनोरुग्णालयात तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडून अशा किरकोळ मनोरुग्णांवर उपचार करण्याची यंत्रणा असताना ताप, खोकल्यासाठी मेडिकलमध्ये का आणले जाते, हा मेडिकलमधील डॉक्‍टरांचा सवाल आहे.

Web Title: nagpur news hospital Government Medical College

टॅग्स