भाजीविक्रेत्याच्या अंध मुलाने मारली बाजी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

नागपूर - ‘पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है...’ या ओळी हिस्लॉप महाविद्यालयाच्या शुभम नंदेश्‍वर याच्या बाबतीत तंतोतंत खऱ्या ठरतात. शुभमने बारावीमध्ये  कला शाखेतून ८१ टक्के गुण मिळवित अंध विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

अंध असला तरी मनामध्ये असंख्य स्वप्ने असलेल्या शुभमने हार न मानता सदैव हसतमुखाने समस्यांचा सामना केला. शिक्षणासोबतच संगीताचा छंद असलेला शुभम उत्तम ऑक्‍टोपॅडवादक आहे. तो स्वत: विविध कंपोझिशन तयार करतो. त्याने कंपोज केलेली चाल एकदा ऐकल्यानंतर कधीही विसरू शकत नाही, असे ऐकणारे सांगतात.

मंगळवारी बारावीचा निकाल लागला तेव्हा शुभमसह कुटुंबीयांचा आनंद वाढला होता. शुभमचे वडील वीरेंद्र हे भाजीविक्रेता असून, मेडिकल कॉलेज परिसराजवळ राहतात. स्वत:च्या यशाबाबत बोलताना शुभम म्हणाला, अथक परिश्रम आणि नियमित अभ्यासामुळेच चांगले गुण मिळाले. शुभमने अभ्यासाची तयारी संगणक आणि मोबाईलवर असलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगद्वारे केली. याशिवाय आई बबिता व बहिणी सोनम व आकांक्षा या दररोज पुस्तक वाचून दाखवायच्या. या माध्यमातून शुभमने अभ्यास पूर्ण केला. शुभमला आयएएस व्हायचे असून, त्यासाठी  आतापासूनच तयारी सुरू झाली आहे.

Web Title: nagpur news Hsc result blind shumbham nandeshwar