वकिलांचे आता "खेड्यांकडे चला'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

नागपूर - न्यायदानापासून वंचित राहिलेल्या विदर्भातील ग्रामीण जनतेपर्यंत पोचून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी "हायकोर्ट बार असोसिएशन'ने एक पाऊल पुढे टाकले आहे. न्या. भूषण गवई यांच्या हस्ते आज एका विशेष उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. येत्या 21 एप्रिलला गडचिरोलीच्या दुर्गम भागांमधील गावांना भेटी देत वकील मंडळी तेथील स्थानिकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणार आहेत. अकरा जिल्ह्यांसाठी वकिलांचे अकरा चमू तयार करण्यात आले आहेत.
Web Title: nagpur news lawyer khedyakade chala