महाराजबागेतील जाईचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

नागपूर - महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण असलेली जाई वाघिणीचा गुरुवारी सकाळी पाच वाजता मृत्यू झाला. सहा महिन्यांपासून ती मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होती. तिच्यावर उपाचारसुद्धा सुरू होते. मात्र, डॉक्‍टरांच्या उपचाराला यश आले नाही. जाईच्या मृत्यूने प्राणिप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

आईपासून दुरावलेल्या जाई व जुई या दोन बछड्यांना २००८ साली चंद्रपूरच्या जंगलातून नागपूरला आणण्यात आले होते. तेव्हापासून दहा वर्षे या दोघी महाराजबाग प्राणिसंग्रहालयात होत्या. जुईचा मृत्यू मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात झाला. त्यानंतर जाई ही महाराजबागेतील आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनली होती. पाच मार्च २०१७ ला तिला सापाने दंश केला होता. शर्थीचे प्रयत्न करून डॉक्‍टरांनी तिचे प्राण वाचविले होते.

१७ नोव्हेंबरला तपासणीत तिचे दोन्ही मूत्रपिंड निकाली झाल्याचे निदर्शनास आले. तेव्हापासून जाईवर उपचार सुरू होते. प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाल्यानंतर १२ मार्चला मोठ्या पिंजऱ्यात हलविले होते. २५ मार्चला पुन्हा प्रकृती खालावल्यानंतर  दवाखान्यात हलविले. त्यानंतर तिची प्रकृती ढासळत गेली. गुरुवारी तिचा मृत्यू झाला. सकाळी साडेअकरा वाजता जाईचे शवविच्छेदन करण्यात आले. डॉ. प्रशांत सोनकुसरे, डॉ. विनोद धूत, डॉ. गौतम भोजने, डॉ. सुनील बावस्कर उपस्थित होते. दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास प्राणिसंग्रहालय परिसरात जाईला अग्नी दिल्याची माहिती महाराजबागेतील डॉ. सुनील बावस्कर यांनी दिली.

Web Title: nagpur news maharajbaug zoo jai tiger death