चार वर्षांनंतरही नाही 22 लाखांचा हिशेब 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एमबीबीएसला शिकणारे विद्यार्थी वर्गाला दांडी मारतात. वर्षात अवघे 22 टक्के उपस्थिती असते. यावर उपाय म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार दंड वसुलीचा फतवा जारी करण्यात आला. मात्र दंडाची रक्कम गोळा करण्याचा "हेड' अद्याप तयार करण्यात आला नसल्याने विभाग प्रमुखांकडेच हा निधी ठेवण्यात येणार आहे. मात्र चार वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांकडून दंड वसुलीचा 20 लाखांचा निधी गायब झाला होता, अद्याप या निधीचा थांगपत्ता नाही. यामुळे यावेळीही गैरव्यवहाराची चर्चा मेडिकल वर्तुळात रंगली आहे. 

मेडिकलमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला 200 विद्यार्थी क्षमता आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोट्यवधी खर्च होतात. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाचे 800 एमबीबीएसचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांची 100 टक्के वर्गात उपस्थिती असते. मात्र, दुसरे वर्ष सुरू होताच सामूहिक बंक मारणे सुरू होते. मेडिकल, मेयोसह मुंबईच्या जे. जे. रुग्णालयापर्यंत हीच स्थिती आहे. मेडिकलमध्ये द्वितीय वर्षापासून केवळ 22 टक्के विद्यार्थी नियमित वर्गात बसत असल्याचे हजेरीतून पुढे आले. मेडिकलच्या तुलनेत जे.जे.मधील विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प आहे. भारतीय वैद्यक परिषदेच्या निकषानुसार एका शैक्षणिक सत्रातील सहामाही उपस्थिती किमान 45 टक्के हवी. त्यानुसार वर्षातून किमान दोन तास या प्रमाणे 90 तास उपस्थिती राहणे आवश्‍यक असते. त्या तुलनेत विद्यार्थी 25 टक्के उपस्थित नसतात. यामुळे दंड आकारण्याचा फंडा सुरू करण्यात आला. 

गैरव्यवहाराची जोरदार चर्चा  
चार वर्षांपूर्वी मेडिकलच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे (एमडी) विद्यार्थी प्रशिक्षण पूर्ण करीत नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे दंड वसूल करण्यात आला होता. सुमारे 20 लाख रुपयाची दंडातून वसुली झाली, अशी मंजुरी तत्कालीन अधिष्ठात्यांनीही दिली होती. हा निधी एका विभागाकडे गोळा केला. पुढे हा निधी कुठे हरवला हेच कळायला मार्ग नाही. 20 लाखांचा निधी कुठे गायब झाला, ही चर्चा मात्र कॉलेज कौन्लिमध्ये चर्चेला येत होती. चौकशी समिती गठित केली. परंतु चार वर्षांनतरही हाती काहीच लागले नाही. मेडिकलमध्ये गैरहजर विद्यार्थ्यांना 500 रुपयांचा आकारण्यात येणारा दंड वसुलीचे, गोळा करण्यासंदर्भातील निकष, नियम आणि अटी ठरवून घ्यावे अशीही चर्चा मेडिकल वर्तुळात सुरू झाली.

Web Title: nagpur news medical college