मिहान परिसरात मेट्रो रेल्वेचा इको पार्क

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

नागपूर - मेट्रो रेल्वेच्या मिहान डेपोला लागून १३ एकर जागेवर इको पार्क साकारणार असून, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी मंगळवारी भूमिपूजन करीत पाया रचला. पर्यटकांच्या आकर्षणासाठी मनोरंजन झोन, क्‍लब हाउस, अर्बन झोन येथे उपलब्ध राहणार आहे.

नागपूर - मेट्रो रेल्वेच्या मिहान डेपोला लागून १३ एकर जागेवर इको पार्क साकारणार असून, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी मंगळवारी भूमिपूजन करीत पाया रचला. पर्यटकांच्या आकर्षणासाठी मनोरंजन झोन, क्‍लब हाउस, अर्बन झोन येथे उपलब्ध राहणार आहे.

मिहान येथे मेट्रो रेल्वे डेपो असून, नागपूरकरांसाठी ते पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. इको पार्कमध्ये ५०५० वर्ग मीटर परिसरात मनोरंजन झोन तयार केला जाणार आहे. यात नॉन अम्पिथिएटर, लाइट आणि साउंड शो, फूड कोर्ट थीमवर आधारित खेळाचीही सुविधाही राहणार आहे. या भागात असलेल्या दोन नाल्यांचा उपयोग करून परिसराला आकर्षक करण्यात येणार आहे.

इको पार्कपर्यंत पोहोचण्यासाठी मेट्रो रेल्वेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. याशिवाय १३,५५० वर्ग मीटरमध्ये ॲग्रो टुरिझम क्षेत्र विकसित केले जाणार आहे. या ठिकाणी व्हर्टिकल फार्मिंग, हुरडा फेस्टिव्हल, स्मार्ट पायलट प्रोजेक्‍टही राहील. ४,२३० वर्ग मीटरमध्ये क्‍लब हाऊस, ५,६५० वर्ग मीटरमध्ये अर्बन मार्केट, ४,२३० वर्ग मीटरमध्ये वेट लॅन्ड इको लॉजिकल झोन तयार करण्यात येणार आहे. इको पार्कच्या निर्मितीसाठी २५ कोटींची तरतूद केली आहे. यावेळी महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेशकुमार अग्रवाल, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रिच-१) देवेंद्र रामटेककर, महाव्यवस्थापक (मालमत्ता) नंदनवार, अतिरिक्त महाव्यवस्थापक (प्रॉपर्टी डेव्हलपमेंट) संदीप बापट, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (मिहान डेपो) साईशरण दीक्षित होते.

Web Title: nagpur news mihan metro railway eco park