उत्पादन १४ कोटी, विक्री ५६ कोटींची!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

नागपूर - देशात १४ कोटी लिटर दुधाचे उत्पादन होते. मात्र, विक्री ५६ कोटी लिटरची होते. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ होत असल्याचे दिसून येते. भेसळ रोखण्यासाठी नैसर्गिक आणि सिंथेटिक दुधाचे मानक निश्‍चित करणे गरजेचे आहे, असे मत भारतीय पशुकल्याण बोर्डाचे सदस्य मोहनसिंग अहलुवालिया यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

नागपूर - देशात १४ कोटी लिटर दुधाचे उत्पादन होते. मात्र, विक्री ५६ कोटी लिटरची होते. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ होत असल्याचे दिसून येते. भेसळ रोखण्यासाठी नैसर्गिक आणि सिंथेटिक दुधाचे मानक निश्‍चित करणे गरजेचे आहे, असे मत भारतीय पशुकल्याण बोर्डाचे सदस्य मोहनसिंग अहलुवालिया यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

अन्न व प्रशासन विभागाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात दुधात ६८.७. टक्के भेसळ होत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे कॅन्सर व इतर आजार होत आहेत असेही त्यात म्हटले आहे. हरियाना, पंजाब, राजस्थान राज्याच्या तुलनेत विदर्भात दूध उत्पादकांची संख्या कमी आहे. दूध हे आवश्‍यक वस्तूमध्ये मोडते. त्यामुळे राज्य शासनाने दुधाचे कमाल व किमान दर निश्‍चित करायला हवा. दुधाच्या खरेदी आणि विक्रीचे दर निश्‍चित झाल्यास दूध उत्पादकांसह ग्राहकांसाठी ते फायदेशीर ठरेल. या वेळी त्यांनी गायीच्या दुधाला ३५ तर म्हशीच्या दुधाला ४५ रुपये लिटर दर द्यावा, अशी मागणी अहलुवालिया यांनी केली. 

गोरक्षकांनी गायी पाळाव्या
गोरक्षेच्या नावावर मारहाण करणे योग्य नाही. जनावरांची वाहतूक करण्याची परवानगी असते.  त्यामुळे प्रत्येक वाहतूक अवैध म्हणता येणार नाही. जनावरांच्या कत्तलीबाबत केंद्राचा कोणताही कायदा नाही. गोरक्षकांनी गायी स्वत: पाळायला हव्या. बेवारस गायींची काळजी करायला हवी. जनावर खरेदी, विक्रीच्या बाजारात डॉक्‍टरकडून फिटनेस प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतरच त्याचा व्यवहार होईल. गोहत्या कायद्यातील काही अटी शेतकऱ्यांच्या हिताची नसल्याने त्यात सुधारणा होणार आहे. चामड्याच्या उद्योगामुळेच जनावरांच्या अवैध कत्तली वाढल्याचा आरोपही अहलुवालिया यांनी लावला. 

रामदेवबाब दुधाचे उत्पादन करीत नाही
दूध व तूप हे रामदेवबाबाचे प्रोडक्‍ट आहेत. मात्र, त्यांच्याकडे दुधाचे उत्पादन होत नाही. त्यामुळे ते दूध कुठून आणतात हे माहीत नाही. याबाबत आपण केंद्र शासनाकडे विचारणा केली आहे. नेपाळमध्ये रामदेवबाबांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आल्याची माहितीही अहलुवालिया यांनी दिली.

Web Title: nagpur news milk