गाण्यापूर्वी रफी अभिनेत्याचे हावभाव टिपायचे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

नागपूर - मोहम्मद रफी ज्या अभिनेत्यावर चित्रित होणारे गाणे गायचे, त्या अभिनेत्याचे हावभाव आत्मसात करायचे. त्यानंतर त्यांनी गायलेल्या गाण्यात तोच अभिनेता दिसायचा. जणू ते गाणे रफी यांनी नव्हे, तर अभिनेत्यानेच गायल्याचा भास आजही होतो, असे आकाशवाणीचे  ज्येष्ठ उद्‌घोषक डॉ. कमल शर्मा म्हणाले.

राष्ट्रीय रफी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. मोहम्मद रफी फॅन्स कल्चरल ऑर्गनायझेशनच्या वतीने त्रिदिवसीय राष्ट्रीय रफी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रफी यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी परिसंवादाचे आयोजन केले. यामध्ये कमल शर्मा  यांच्यासह डॉ. ख्वाजा 

रब्बानी, डॉ. रवी वानखेडे सहभागी झाले. समन्वयन डॉ. सागर खादीवाला यांनी केले. मोहम्मद रफींच्या चेहऱ्यावर विलक्षण हसमुख भाव असायचा. एखादे वेदनादाई गाणे गातानाही, त्यांचा तो हसमुख रुबाब गाण्यात दैवी चमत्कार ओतत असे. त्यांचा धर्म केवळ प्रेमाचा होता. त्यांच्या गीतांमुळे प्रेमभावनेचा प्रसार झाला. ते पाण्याप्रमाणे होते. जे गाणे जशाप्रकारचे असेल तसे त्या गाण्याला वळण देत. 

जगप्रसिद्ध गायक एल्विस प्रिस्ले याची ओळख भारतात तेव्हाही नव्हती आणि आजही नाही. परंतु, रफी यांना तो माहीत होता. त्याचेही अनुकरण गाण्याच्या बाजानुसार त्यांनी एकदोन गाण्यात लीलया केले. त्यावरून ते एक सिद्धहस्त कलावंत  असल्याचे स्पष्ट होते, असेही कमल शर्मा म्हणाले. डॉ. ख्वाजा रब्बानी यांनी एक कलावंत आणि एक माणूस म्हणून रफी यांच्यातील मोठेपणाविषयी विचार मांडले. 

शरद वायपूर यांना सहकार्य
सलिम चिमठावाला यांना मूत्रपिंड दान केल्यावर त्यांच्या धर्मसहिष्णुतेची चर्चा सर्वदूर झाली. त्यातूनच कोल्हापूरवरून चित्रकार शरद वायपूर यांचे पत्र प्राप्त झाले. ललित कलेतील पदव्युत्तर पदवी असतानाही भीक मागून आणि दारोदार चित्र विकून उदरनिर्वाह करणाऱ्या शरद वायपूर यांना रफींनी ओळख नसतानाही केवळ वायपूर यांच्या चित्रात राग मल्हार दिसतो, या नात्याने सहकार्य केले, असे डॉ. रवी वानखेडे म्हणाले.

Web Title: nagpur news Mohammad Rafi