एमआरआय काढायचाय, दोन महिन्यांनंतरची तारीख 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रेडिओलॉजी विभागात सीटी स्कॅन तसेच एमआरआय करण्यासाठी आलेल्या रुग्णांना दोन महिन्यांनंतरची तारीख देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मेडिकलमध्ये एक एमआरआय आहे. या एमआरआयवर दर दिवसाला पस्तीसच्यावर एमआरआय काढले जातात. मात्र, मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णांची गर्दी लक्षात घेता पुन्हा एका एमआरआयची गरज आहे. हीच अवस्था सिटी स्कॅनसाठी आहे. सकाळी दहा वाजता सिटी स्कॅन काढण्यासाठी आलेला रुग्ण दोन तासांनंतरही येथे स्ट्रेचरवर पडून असतो. मात्र, त्यांचा सिटी स्कॅन काढला जात नाही.

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रेडिओलॉजी विभागात सीटी स्कॅन तसेच एमआरआय करण्यासाठी आलेल्या रुग्णांना दोन महिन्यांनंतरची तारीख देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मेडिकलमध्ये एक एमआरआय आहे. या एमआरआयवर दर दिवसाला पस्तीसच्यावर एमआरआय काढले जातात. मात्र, मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णांची गर्दी लक्षात घेता पुन्हा एका एमआरआयची गरज आहे. हीच अवस्था सिटी स्कॅनसाठी आहे. सकाळी दहा वाजता सिटी स्कॅन काढण्यासाठी आलेला रुग्ण दोन तासांनंतरही येथे स्ट्रेचरवर पडून असतो. मात्र, त्यांचा सिटी स्कॅन काढला जात नाही. तर रुग्ण गंभीर नसेल तर मात्र महिनाभरानंतर रुग्णांना तारीख दिली जाते. या दरम्यान रुग्णाला असलेला आजार अधिक वाढण्याची पर्यायाने जीवाची भीती आहे. मेडिकलमध्ये दर दिवसाला साडेतीनशेवर एक्‍स रे काढण्यात येतात. सत्तर सीटी स्कॅन तसेच पस्तीस एमआरआय होत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, यासाठी आवश्‍यक तांत्रिक मनुष्यबळ कमी असले तरी रेडिओलॉजी विभागातील डॉक्‍टर पुढाकार घेत नसून येथील एक्‍स रे तंत्रज्ञ पुढे असल्याची चर्चा या विभागात रंगली आहे. 

मेडिकलच्या रेडिओलॉजी विभागात दोन सीटी स्कॅन आहेत. यातील एक सीटी स्कॅन नेहमीच बंद असते. द्रवरूपातील महागडे औषधच खरेदीची सक्ती रुग्णांवर केली जाते, अशी तक्रार रुग्णांच्या नातेवाइकांनी केली आहे. 

तत्काळ एमआरआय निदान व्हावे ः डॉ. निसवाडे  
रेडिओलॉजी विभागात एमआरआय, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि एक्‍स रे काढण्यासाठी आलेल्या रुग्णाचे तत्काळ निदान व्हावे. या विभागात वेटिंग लिस्ट वाढण्याचे कारणमीमांसा करण्यात येईल. विभागप्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांची संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढला जाईल, असे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे म्हणाले. 

"मेडिकल असो की, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. येथे गरिबांना मोफत उपचार मिळावेच. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक, बीपीएलधारक यांच्या आजारांचे निदान वेळेत तसेच मोफत व्हावे. रेडिओलॉजी विभागातील एमआरआय, सीटी स्कॅनची वेटिंग लिस्ट संपवण्यासाठी अधिष्ठातांनी पुढाकार घ्यावा. यासंदर्भात लवकरच अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांची भेट घेण्यात येईल.  
-चंद्रहास राऊत, माजी संपर्कप्रमुख, विदर्भ, शिवसेना

Web Title: nagpur news MR medical college