महिला तस्करीत मुंबईचा क्रमांक दुसरा - विजया रहाटकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

नागपूर - महिला तस्करी हा गंभीर विषय असून, यात कोलकतानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. यावर उपाय आणि चिंतनासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशनतर्फे २७ व २८ जुलै रोजी मुंबई येथे ‘महिलांची तस्करी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. यात २५ देशांतील १००च्यावर प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज दिली.

परिषदेत ‘महिला तस्करी’ विषयावर चर्चा होऊन ही अमानवी प्रथा रोखण्यासाठी एक फोरम तयार करण्यात येईल. तसेच विविध उपाययोजना सुचविण्यात येतील. महिला तस्करीसंदर्भातील प्रत्यक्ष घडणारे गुन्हे आणि त्याचे महिलांवर होणारे परिणाम, मानवी तस्करीसारखे गुन्हे रोखणे, त्याविरुद्ध लढणे, त्याबरोबरच तस्करीमुळे होणारा परिणाम, मानवी तस्करी संबंधातील गुन्हेगारी, सायबर ट्रॅफिकिंग आणि तस्करीविरोधात माध्यमांची भूमिका याबाबतीत प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. तस्करीसंबंधात नवीन कायदा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या महिलांचे नगारा आंदोलन
शहरातील महिलांवर होत असलेल्या अत्याचाराला विरोध दर्शविण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिलांकडून रविभवन येथील आयोजित पत्रकार सभा कक्षाबाहेर नगारा आंदोलन करण्यात आले. रहाटकर यांनी त्यांच्याकडून माहिती समजावून घेतली आणि सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. 

Web Title: nagpur news mumbai second noumber in women smuggling