बस ऑपरेटरच्या धमकीनंतर मनपाने दिले दीड कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नागपूर - ऑक्‍टोबरपासून शहर बससाठी देय निधी थकल्याने बस ऑपरेटरने सेवा बंद करण्याची धमकी दिल्यानंतर आज महापालिकेने दीड कोटी रुपये देऊन त्यांची बोळवण केली. त्यामुळे नागपूरकरांवरील संकट तूर्तात टळले आहे. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती बघता ऑपरेटर्सना वेळेवर निधी न मिळाल्यास शहर बससेवा कधीही बंद होण्याची शक्‍यता आहे. 

महापालिकेने शहर बससेवेचे कंत्राट वेगवेगळ्या बस ऑपरेटर्सना दिले आहे. शहर बस ऑपरेटला महिन्याकाठी निधी देण्याची तरतूद करारात आहे. मात्र, महापालिकेतर्फे ऑपरेटर्सला वेळेवर निधी दिला जात नसल्याच्या ऑपरेटर्सच्या तक्रारी आहेत. डिम्स, हंसा आणि श्‍यामा शाम या  ऑपरेटर्सचा निधी ऑक्‍टोबरपासून थकीत आहे. बस चालविण्यासाठी ऑपरेटर्सलाही निधीची गरज असते. परंतु, वेळेवर निधी मिळत नसल्याने ऑपरेटर्स त्रस्त झाले आहे. ऑक्‍टोबरपासून या ऑपरेटर्सना निधी मिळाला नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिकेने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे काल, १० जानेवारी रोजी हंसा ट्रॅव्हल्सने पत्राद्वारे केव्हाही बससेवा बंद करण्याची धमकी महापालिकेला दिली होती. या धमकीमुळे बससेवेवरही संकट निर्माण झाले  होते. 

टप्प्या-टप्प्याने थकीत निधी देणार
महापालिकेने आज दीड कोटी रुपये डिम्स, हंसा आणि श्‍यामा श्‍याम या ऑपरेटर्सला दिल्याचे व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी सांगितले. ही थकबाकी केवळ ऑक्‍टोबरची असून सोमवारपासून नोव्हेंबरपासून थकबाकी ऑपरेटर्सला देण्यात येणार असल्याचे समजते. नोव्हेंबरची एकट्या हंसा ट्रॅव्हल्सचे तीन कोटी ३६ लाख रुपये देय आहे. सर्वच ऑपरेटरला टप्प्या-टप्प्याने थकीत निधी देण्यात येणार आहे.

Web Title: nagpur news municipal 1.5 crore give for bus