पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

मांढळ -  कुही तालुक्‍यातील तारणा येथील बबन बापूराव मोहनकरने (36) सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास किरकोळ कारणावरून पत्नी ज्योतीला (31) आंबोली शिवारात कुऱ्हाडीने वार करून ठार केले. यानंतर बबनने गळफास लावून आत्महत्या केली. मृत बबनचा लहान भाऊ भारतच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. 

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन व ज्योती हे दोघेही सोमवारी शेतीसाठी ट्रॅक्‍टर येणार होते म्हणून सकाळी आठलाच आंबोली परिसरातील शेतावर गेले. मात्र, ट्रॅक्‍टर न आल्याने दोघेही शेतात सरपण गोळा करीत होते. यावेळी बबनने कुऱ्हाडीने वार करून ज्योतीला ठार केले आणि स्वत: गळफास लावला. वार्ता कळताच बबनची आई लीलाबाई नातवंडांना उराशी धरून धाय मोकलून रडू लागली. तिच्याबरोबर बबनचा मुलगा याबेश (आठ) व मुलगी रिबिका (पाच) हे रडू लागले. सुमारे दोन अडीच वर्षांपूर्वी दोघांत वाद झाल्यामुळे बबनची पत्नी ज्योती काही दिवस माहेरी गेली होती. या घटनेने दोन्ही चिमुकले पोरकी झाली.

Web Title: nagpur news murder case

टॅग्स