खापरखेड्यात युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

खापरखेडा - इंदिरानगर आबादी परिसरात मोबाईल हिसकावल्याच्या कारणावरून तरुणाचा खून झाल्याची घटना रविवारी (ता. ३०) रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मृताचे नाव रवींद्र बावणे (वय २३, इंदिरानगर आबादी) असून अश्विन श्‍यामराव ढोणे (वय २६), रंजित रमेश राऊत (वय २२, दोघेही रा. इंदिरानगर आबादी), पीयूष रमेश पानतावणे (वय २४, रेल्वे चौकी खापरखेडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

रवींद्र सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अटकेतील आरोपीसुद्धा सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध  गुन्हे दाखल आहेत. रवींद्र व आरोपी एकमेकांचे चांगले परिचयाचे असून मित्र होते. रवींद्र काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटून आला होता. हाताला कामधंदा नाही म्हणून तो हैदराबादला कामासाठी गेला होता. तो दोन दिवसांपूर्वीच खापरखेड्याला परतला होता. रविवारी रात्रीच्या सुमारास इंदिरानगर आबादी परिसरात आरोपी अश्विन, रंजित मोबाईल हाताळत होते. त्यावेळी रवींद्र घटनास्थळी गेला. त्याने फोन करायचा आहे, असे सांगून मोबाईल मागितला. मात्र यावेळी रवींद्र मोबाईल देत नव्हता. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. आरोपी मारहाण करीत असल्याचे पाहून रवींद्र तेथून पळाला. दरम्यान, रवींद्रला आरोपी अश्‍विन व रंजित शोधत असताना तिसरा आरोपी पीयूष याची भेट झाली. अर्ध्या तासानंतर रवींद्र आरोपी अश्विनच्या घरासमोर आढळला. तिन्ही आरोपींनी रवींद्रला मारहाण केली. जवळच्या सत्तूरने त्याच्या पायावर वार करून त्याला ठार केले.

Web Title: nagpur news murder case