शेतकऱ्यांच्या दुर्दशेवरून शासनाचे कान टोचा - पटोले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

नागपूर - राज्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या, कीटकनाशकांच्या फवारणीमुळे झालेले शेतकऱ्यांचे मृत्यू, नोटाबंदी, जीएसटी यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल आहेत.  शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारचे कान टोचावे, अशी विनंती भाजपचे  खासदार नाना पटोले यांनी आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना केली. खासदार नाना पटोले यांनी बेंगळुरू येथे जाऊन त्यांची भेट घेतली.

येत्या १० नोव्हेंबरला यवतमाळ येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात आपण उपस्थित राहून  मार्गदर्शन करावे, असे निमंत्रण पटोले यांनी श्री श्री रविशंकर यांना दिले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून, त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यात त्वरित जमा करावी. विदर्भात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे झालेले मृत्यू, शेती उत्पादनात वाढलेला खर्च व पिकांना कमी भाव असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे तर शेतमजूर गाव सोडून शहरांकडे वळले आहेत. जीएसटी नोटाबंदीमुळे आर्थिक  मंदी आली आहे. त्याचा फटका सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांनाही बसला आहे. या सगळ्या मुद्यांवर श्री श्री रविशंकर यांनी केंद्र व राज्य सरकारशी चर्चा करून मध्यस्थी करावी, अशी  मागणी त्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये होत असलेल्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. येत्या १७ व १८ नोव्हेंबरला नागपूरला येण्याचे आश्‍वासन  श्री श्री रविशंकर यांनी पटोले यांना दिले.

Web Title: nagpur news Nana Patole farmer suicide