लाचखोर निंबाळकरला जामीन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नागपूर - ग्रामसेविकेकडून लाच घेण्याच्या प्रकरणात एसीबीने अटक केलेले जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण निंबाळकर याला आज जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. दुसरीकडे आजच त्याच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. 

नागपूर - ग्रामसेविकेकडून लाच घेण्याच्या प्रकरणात एसीबीने अटक केलेले जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण निंबाळकर याला आज जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. दुसरीकडे आजच त्याच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. 

तक्रारकर्त्या भिवापूर तालुक्‍यातील चिचाळा ग्रामपंचायत येथे ग्रामसेविका पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे ऑगस्ट 2016 ते जून 2017 या कालावधीसाठी नांद या गावातील गटग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे झाल्याचा आरोप झाले आहेत. याप्रकरणी या ग्रामसेविकेविरुद्ध चौकशी सुरू असून ती निंबाळकरकडे सोपविण्यात आली. ग्रामसेविकेविरुद्ध कोणतीही कारवाई न करता ही फाइल बंद करण्यासाठी निंबाळकरने तिच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती. एसीबीने निंबाळकरला पैसे घेताना शुक्रवारला रंगेहाथ अटक केली होती. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज त्याला पुन्हा न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला. 

भुतेंचे बयाण कधी? 
जिल्हा परिषदेचे कॉंग्रेसचे सदस्य उपासराव भुते यांचेही नाव आले आहे. निंबाळकरला भुतेंनी लाचेची रक्कम देण्यास सांगितली होती. त्यानुसार आपण भुते यांना 50 हजार रुपयांची रोख रक्कम दिल्याचे ग्रामसेविकेने तक्रारीत म्हटले आहे. एसीबी या प्रकरणी त्यांचेही बयाण घेणार आहे. परंतु, अद्याप हे बयाण नोंदविण्यात आलेले नाही. निंबाळकरचा मुलगाही एसीबीला गवसला नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: nagpur news Nimbalkar to bail out