अवयवदानाअभावी 5 लाख व्यक्ती गमावतात प्राण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

नागपूर - मूत्रपिंड (किडनी), फुफ्फूस, यकृत, स्वादूपिंड, हृदय, हृदयाच्या झडपा, आतडी, डोळे, कानाचे ड्रम, त्वचा हे मानवाच्या शरीरातील विविध अवयवदान करून एक मृत व्यक्ती इतर दहा व्यक्तींना नवा जन्म देऊ शकतो. या अवयवांचे दान होत नसल्यामुळे दरवर्षी देशात पाच लाख व्यक्ती प्राण गमावतात. दर 11 मिनिटांनी अवयवदानाअभावी होणारे मृत्यू काही प्रमाणात अवयवदानातून थांबवू शकतो, असा विश्‍वास इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत यांनी आज व्यक्त केला. 

येत्या रविवारी, 13 ऑगष्ट रोजी उपराजधानीत दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर सभागृहात जागतिक अवयवदान दिन साजरा होईल. सिनेअभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, महापौर नंदा जिचकार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याची माहिती देताना डॉ. खंडाईत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सद्या देशात पाच लाख किडनी, 50 हजार यकृत तर 2 हजारांहून अधिक ह्रदय विकारांनी ग्रस्त रुग्ण अवयवाच्या प्रतीक्षेत असल्याची विदारक स्थिती असल्याचे सांगून नेत्रदान व रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करतानाच दरवर्षी देशात होणारे मृत्यू लक्षात घेता अवघ्या 11 दिवसांत संपूर्ण दृष्टीहिनांच्या डोळ्यातील अंधार दूर होईल. परंतु दररोज होणाऱ्या मृतकांचे नेत्रदान होणे सक्तीचे व्हावे असेही त्या म्हणाल्या. दररोज अवयवदानाअभावी 6 हजार मृत्यू होत असल्याचे वास्तव पुढे आल्यामुळेच शासनाने अवयवदानासंदर्भात समाजात जनजागरण अभियान सुरू केले आहे. शासनाच्या या उपक्रमात जिल्हा प्रशासन, आयएमए, महापालिका, नागपूर रोटरी क्‍लब, अकादमी ऑफ मेडिकल सायन्स, जनआक्रोश, जेसिस क्‍लब ऑफ नागपूर, मोहन फाउंडेशन, विभागीय अवयवदान समिती, बाह्य रुग्णालये सहभागी होत आहेत. 

पत्रकार परिषदेला डॉ. वाय एस देशपांडे, डॉ. समीर जहागीरदार, डॉ. प्रशांत राठी, डॉ. अनिल लद्दढ, रवी कासकिडीकर, डॉ. राजन, डॉ. अलका मुखर्जी, डॉ. शिवाणी बिंदये उपस्थित होते. 

नागपुरात 240 जण किडनीच्या प्रतीक्षेत 
नागपुरात जिल्ह्यात किडनीचा आजार बळावत असून सद्या 240 जण किडनीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती मोहन फाउंडेशनचे डॉ. रवी वानखेडे यांनी यावेळी दिली. प्रत्येक मेंदूमृत्यूची नोंद केली जावी असे सांगताना आतापर्यंत 19 मेंदू मृतकांचे अवयवदान करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: nagpur news organ