पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

नागपूर - पेट्रोल कमी दिल्याचा जाब विचारल्याने एका युवकाला दमदाटी करणाऱ्या युवकाच्या साथीदारांनी पंपावरील कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी कळमना पोलिसांनी सात युवकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. आरोपींमध्ये कपिल सदाशिव शेंद्रे (२४), सूरज रघुनाथ रोहनकर (२२), विशाल शंकरराव येरपुडे (२२), स्वप्निल पुरुषोत्तम ढोमणे (१९), नंदू टीकाराम भजभुजे (२२), शंकर तायवाडे, संकेत शिवणे यांचा समावेश आहे. सूरज इंदल काडेकार (२०, रा. अशोकनगर, पारडी) हा भंडारा मार्गावरील पाल पेट्रोल पंपावर कर्मचारी आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच ते पावणेसहाच्या दरम्यान आरोपी कपिल व विशाल हे दोघेही पंपावर आले.

नागपूर - पेट्रोल कमी दिल्याचा जाब विचारल्याने एका युवकाला दमदाटी करणाऱ्या युवकाच्या साथीदारांनी पंपावरील कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी कळमना पोलिसांनी सात युवकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. आरोपींमध्ये कपिल सदाशिव शेंद्रे (२४), सूरज रघुनाथ रोहनकर (२२), विशाल शंकरराव येरपुडे (२२), स्वप्निल पुरुषोत्तम ढोमणे (१९), नंदू टीकाराम भजभुजे (२२), शंकर तायवाडे, संकेत शिवणे यांचा समावेश आहे. सूरज इंदल काडेकार (२०, रा. अशोकनगर, पारडी) हा भंडारा मार्गावरील पाल पेट्रोल पंपावर कर्मचारी आहे. रविवारी सायंकाळी साडेपाच ते पावणेसहाच्या दरम्यान आरोपी कपिल व विशाल हे दोघेही पंपावर आले. त्या ठिकाणी सूरज काडेकार हा पेट्रोल भरत होता. पेट्रोल कमी दिल्याच्या कारणातून कपिल, विशाल या दोघांनी सूरजला जाब विचारला. पेट्रोल कमी दिल्यामुळे संतापलेल्या कपिलने सूरजला शिवीगाळ केली. तर सूरजने पंपावरील सर्वच कर्मचाऱ्यांना बोलावून कपिलला शिवीगाळ करीत धमकी दिली. काही वेळानंतर कपिल त्याच्या इतर साथीदारांना घेऊन पेट्रोल पंपावर आला.  त्याने सूरजला शिवीगाळ करून लाठीकाठीने हल्ला चढविला. सूरजच्या मदतीला पेट्रोल पंपावरील इतर कर्मचारी आल्यानंतर आरोपींनी पळ काढला. यानंतर कमळना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून सर्व आरोपींना अटक केली आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी पेट्रोल पंपावरील मशीनमध्ये ‘पल्सर’ नावाची मायक्रोचीप बसवून वाहनात कमी पेट्रोल भरण्याचा गोरखधंदा काही पंपांवर होत होता. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी राज्यभर गुन्हे दाखल करून अनेक पेट्रोल पंपावरील मशीन सीलही केल्या होत्या. त्यातही काही पेट्रोल पंपांवर कर्मचारी वाहनात पेट्रोल भरताना नजर चुकवून कमी पेट्रोल भरतात. तर, काही कर्मचारी विशेष करून महिलांना हातचलाखी दाखवून ३० टक्‍क्‍यांपर्यंत कमी पेट्रोल भरतात. मात्र, त्यांच्याशी वाद घातल्यानंतर पंपावरील सर्वच कर्मचारी एकत्र येऊन शिवीगाळ किंवा मारहाणही करण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Web Title: nagpur news petrol pump employee