पेट्रोल @ ८०.७३

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

नागपूर - ‘अच्छे दिन येईल, महागाई कमी होईल’, या घोषणा देत सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना अपेक्षा होत्या. मात्र, सततच्या वाढत्या महागाईने त्या अपेक्षा फोल ठरत आहेत. शहरात पेट्रोलच्या दराने प्रतिलिटर ऐंशी रुपयांचा आकडा ओलांडत मागील तीन महिन्यांतील ही विक्रमी वाढ आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे खिसे हलके होत आहेत.  

ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीला शहरात पेट्रोलच्या दराने प्रतिलिटर ऐंशी रुपयांचा आकडा ओलांडल्याने सर्वस्तरातून विरोध झाला. परिणामी केंद्र आणि राज्य सरकारने विक्री करात प्रतिलिटर दोन रुपयांची सूट दिली. मात्र, दररोज कमी-अधिक प्रमाणात दरवाढ होते. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीनुसार देशात पेट्रोलच्या किमतीमध्ये काही ठरावीक कालावधीनंतर बदल करण्याचे धोरण केंद्र सरकारने बदलले.

मागील जून महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात येतात. सकाळी सहापासून सर्वत्र नव्या दरानुसार पेट्रोल आणि डिझेलची विक्री केली जाते. दररोज काही पैशांचा फरक पडत असल्याने त्यातील वाढ जाणवत नाही. मात्र, मागील साडेतीन महिन्यांतील दरांचा विचार केल्यास पेट्रोलच्या दरामध्ये साडेपाच ते पावणेसहा रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते. शहरात पेट्रोलच्या दरात विक्रमी भाव वाढ झाली असून, राज्यातील नागपुरातच पेट्रोलला अधिक दर मोजावे लागत आहेत. शहरात एक लिटर पेट्रोलसाठी ८० रुपये ७३ पैसे तर डिझेलसाठी ६६ पैसे ८० पैसे द्यावे लागत आहेत. 

तारीख     पेट्रोल दर (प्रतिलिटर)
१६ जानेवारी - ७९.१९
१७ जानेवारी -७९.३१  
१८ जानेवारी - ७९.४८
१९ जानेवारी - ७९.६२
२० जानेवारी - ७९.८१
२१ जानेवारी - ७९.९९ 
२२ जानेवारी - ८०.१४
२३ जानेवारी - ८०.७३

Web Title: nagpur news petrol rate increase