सक्‍करदरा पोलिसांनी केला गुपचूप जाहीर लिलाव!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

नागपूर - सक्‍करदरा पोलिस ठाण्यात जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कोणताही वरिष्ठ पोलिस अधिकारी नसताना एका पोलिस उपनिरीक्षकाने दलालांशी संगनमत गुपचूप लिलाव केला. त्यामुळे पोलिस ठाण्यात वाहन खरेदी करण्यासाठी आलेल्यांनी लिलावाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेऊन घेराव घातल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी फेर लिलावाची प्रक्रिया धुडकावून लावल्याने तब्बल तीन तास तणावाची स्थिती निर्माण झाली होती. 

नागपूर - सक्‍करदरा पोलिस ठाण्यात जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कोणताही वरिष्ठ पोलिस अधिकारी नसताना एका पोलिस उपनिरीक्षकाने दलालांशी संगनमत गुपचूप लिलाव केला. त्यामुळे पोलिस ठाण्यात वाहन खरेदी करण्यासाठी आलेल्यांनी लिलावाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेऊन घेराव घातल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी फेर लिलावाची प्रक्रिया धुडकावून लावल्याने तब्बल तीन तास तणावाची स्थिती निर्माण झाली होती. 

सक्‍करदरा पोलिस ठाण्यात जप्त असलेल्या ४४ वाहनांचा लिलाव शनिवारी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी नायब तहसीलदार सुनील साळवे उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक मधुकर बोकडे यांनी शनिवारी सकाळी दहा वाजता ठाण्यातील फलकावर सूचनापत्र लावून दुपारी १२ वाजता लिलाव करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सहायक पोलिस आयुक्‍त रवींद्र कापगते आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंद नेर्लेकर यांनी लिलावाची प्रक्रिया प्रत्यक्ष बोली लावून पारदर्शी करणार असल्याचे नागरिकांना सांगितले. ठाण्यात जवळपास ८०० ते १००० नागरिकांनी लिलावातील वाहने खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. पीएसआय बोकडे यांनी एकही वाहन लिलावात न ठेवता कागदावर वाहनांची केवळ यादी तयार केली. ४४ वाहनांमध्ये एक स्कॉर्पिओ कार, मारुती-८००, तीन ऑटो आणि ३९ दुचाकींचा समावेश होता. या सर्व वाहनांची शासकीय किंमत केवळ १ लाख ९५ हजार रुपये  ठेवण्यात आली होती. ११ वाजता एसीपी कापगते आणि निरीक्षक नेर्लेकर हे दोन्ही अधिकारी ताजबागमध्ये मृतदेह सापडल्यामुळे रवाना झाले. हीच संधी हेरून पीएसआय बोकडे यांनी ठाण्याच्या मागच्या बाजूला काही दलालांना नेऊन आणि नायब तहसीलदार साळवे यांच्याकडून खरी माहिती दडवून १० मिनिटांच्या आत लिलाव करून टाकला. १२ वाजता होणारा लिलाव अकरा वाजताच झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांनी पोलिसांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नागरिकांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला. ठाण्यात तणाव वाढल्यामुळे पीएसआय बोकडे यांनी अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली. अधिकाऱ्यांनी ठाण्यात आल्यानंतर लिलाव पुन्हा करण्याबाबत आश्‍वासन दिल्यानंतर तणाव निवळल्या गेला.

लिलावाची प्रक्रिया अपूर्ण 
लिलाव करण्यापूर्वी वाहने विकत घेणाऱ्यांच्या नावांची यादी तयार करणे किंवा बोली लावणाऱ्यांकडून काही रक्‍कम डिपॉझिट ठेवणे तसेच लिलावात किती वाहनांचा समावेश आहे या बाबत जाहीरपणे सांगणे, इत्यादी प्रक्रिया पीएसआय बोकडे यांनी पूर्ण केल्या नाहीत. लिलाव स्थळाबाबत साधी सूचनाही देण्यात आली नाही. त्यामुळे लिलाव प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

लिलाव पुन्हा करण्याची मागणी
नायब तहसीलदार साळवे यांना केवळ आठच जण लिलावासाठी आल्याची खोटी माहिती पीएसआय बोकडे यांनी दिली. त्यांनीही शहानिशा न करता दुसरे काम असल्याचे सांगून दहा मिनिटात लिलाव आटोपून टाकला आणि निघून गेले. नागरिकांनी आक्षेप घेतल्यामुळे बोकडे यांनी साळवे यांना फोन करून पुन्हा लिलाव करण्याची विनंती केली. त्यांनी लिलावात उपस्थित असलेल्यांच्या नावे आणि सह्यासुद्धा घेतल्या नाहीत.

Web Title: nagpur news police

टॅग्स