प्रत्येक पोलिसाला हक्‍काचे घर - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

नागपूर - पोलिस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वतःचे हक्‍काचे घर असावे यासाठी गृहमंत्रालय प्रयत्न करीत आहेत. 15 लाखांचे गृहकर्ज दोन दिवसांत उपलब्ध करून दिले जाईल. पोलिसांसाठी उत्कृष्ट दर्जाचे निवासस्थाने बांधण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

नागपूर - पोलिस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वतःचे हक्‍काचे घर असावे यासाठी गृहमंत्रालय प्रयत्न करीत आहेत. 15 लाखांचे गृहकर्ज दोन दिवसांत उपलब्ध करून दिले जाईल. पोलिसांसाठी उत्कृष्ट दर्जाचे निवासस्थाने बांधण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

नागपूर पोलिस आयुक्‍तालयातील भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलिस महासंचालक डॉ. सतीश माथूर, पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌, सहआयुक्‍त शिवाजी बोडखे, महापौर नंदा जिचकार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर उपस्थित होत्या. 

काळानुरूप पोलिसांचे आव्हाने बदलत आहेत. स्ट्रीट क्राईमसह व्हाईट कॉलर क्राईमवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना मेहनत घ्यावी लागत आहेत. राज्य पोलिस दलाला आधुनिक शस्त्रास्त्रे व तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत आहे. नागपूर शहर सीसीटीव्हीच्या नियंत्रणात आले असून, पोलिसांचा "तिसरा डोळा' म्हणून याचा वापर केला जात आहे. सीसीटीव्हीचा वापर आता वाहतुकीचे नियम भंग केल्यानंतर "ई-चालान' देण्यासाठी करण्यात येईल. पोलिसांचा वचक कायम ठेवण्यासाठी दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यावर पोलिसांना भर द्यावा लागेल. "ई-कम्प्लेंट'ची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर ही सेवा वापरणाऱ्यांत महाराष्ट्र पोलिस देशात प्रथम क्रमांक राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. संचालन पोलिस उपायुक्‍त राहुल माकणीकर यांनी केले. सहआयुक्‍त बोडखे यांनी आभार मानले. 

पोलिस डिझेल चोरतात! 
पोलिस विभागातील पोलिस कर्मचारी वाहनातून पेट्रोल-डिझेल चोरतात. झाडाखाली पोलिस वाहन उभे करून डबकीत डिझेल काढतात, अशी कोपरखळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मारली. त्यामुळे हास्याचे फवारे उडाले. परंतु, अनेक पोलिस कर्मचारी एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहत होते. त्यावर गडकरी म्हणाले, इथेनॉल, बायोडिझेलवर वाहन असल्यास पोलिसांना ते चोरता येणार नाही, पोलिस विभागाचे लाखो रुपये वर्षाला वाचतील. 

चार सेवानिवृत्त पोलिस आयुक्तांची उपस्थिती 
पोलिस मुख्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला नागपूर शहराला लाभलेले चार माजी पोलिस आयुक्‍तांना बोलावण्यात आले होते. त्यात डॉ. अंकुश धनविजय, उल्हास जोशी, टी. शृंगारवेल आणि रणजित शर्मा यांचा समावेश होता. 

Web Title: nagpur news police maharshtra CM Devendra Fadnavis