स्पार्किंग, स्फोटामुळे प्रवाशांमध्ये खळबळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

नागपूर - फलाटावर थांबत असलेल्या रेल्वेच्या एका डब्याच्या केबलचा ओएचईला (उच्चदाब वीजवाहिनी) स्पर्श झाला. यामुळे स्पार्किंग होऊन स्फोटासारखा जोराचा आवाज झाला. सोमवारी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली तर सुरक्षा यंत्रणा व तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांना धावाधाव करावी लागली.

रेल्वेवाहतूक नियमित सुरू असताना १२१४५ लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्‍वर एक्‍स्प्रेस नियोजित वेळेपूर्वीच नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर आली. गती फारच कमी असताना एस-२ क्रमांकाच्या बाहेर आलेल्या केबलचा रेल्वेला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीला स्पर्श झाला. यामुळे जोराचा आवाज झाल्याचे प्रवाशांची पळापळ सुरू झाली. धावपळ पाहून रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिस फलाटावर दाखल झाले. तातडीने संबंधित विभागाला सूचना देऊन कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. 

 पाहणी केली असता एस-२ डब्यातून बाहेर निघालेली केबल आणि ओएचईचा स्पर्श झाल्याचे दिसून आले. आपत्कालीन स्थितीत रेल्वे थांबविण्यासाठी असलेल्या चेनची ती केबल असल्याचे स्पष्ट झाले. फारसा धोका नसल्याने रेल्वे पुढे रवाना करण्याचा निर्णय घेतला. मात्र, घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी धोकादायक केबल काढून  घेण्याची मागणी प्रवाशांनी केली. केबल काढल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा पवित्रा प्रवाशांनी घेतला. 

शेवटी कर्मचाऱ्यांनी केबल सुस्थितीत आणल्यानंतरच रेल्वे पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली. पण, या प्रकारामुळे गाडी नियोजित वेळेपेक्षा सुमारे ४० मिनिटे विलंबाने सुटली. स्पार्किंग आणि स्फोट झाल्याचा प्रवाशांचा दावा असला तरी रेल्वे प्रशासनाने मात्र खोडून काढला.

Web Title: nagpur news railway station