उपराजधानीत पावसाच्या सरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

नागपूर - मध्य महाराष्ट्र आणि केरळदरम्यान कमी दाबाचा पट्‌टा निर्माण झाल्याने विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. शहरात बुधवारी सकाळच्या सुमारास अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. गुरुवारीही विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. जवळपास आठवडा कोरडा गेल्याने चिंतित शेतकरी वातावरण बदलल्याने सुखावला आहे.

नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी बुधवारी पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. उत्तर नागपुरातील सदर, झिंगाबाई टाकळीसह अनेक भागांत पहाटेच्या सुमारास जोरदार वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जवळपास तासभर पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारनंतर मात्र पावसाचा एक थेंबही पडला नाही. हवामान विभागाने सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरात १२.५ मिलिमीटर पावसाची नोंद केली. गोंदिया (११.८ मिलिमीटर), ब्रह्मपुरी (१०.८ मिलिमीटर) आणि वर्धा (९.७ मिलिमीटर) येथेही पाऊस पडल्याचे वृत्त आहे.

Web Title: nagpur news rain