वृद्धांच्या डोक्‍यावरचं छत हरवलं

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

नागपूर - कुही मार्गावर नरेंद्र सेवाश्रम, खेतापूर परिसरात डझनभर सेवाभावी तरुणांनी नमन वृद्धाश्रम उभारले. वृद्धांच्या सेवेसाठी हे वृद्धाश्रम सज्ज झाले. परंतु, रविवारी मुसळधार पाऊस आणि वादळाच्या तडाख्याने छत उडाल्याने वृद्धांची गैरसोय होत आहे.

वृद्धाश्रमात ३० वृद्धांची नोंदणी झाली. या वृद्धांच्या डोक्‍यावरचे छत वादळाने हिरावून घेतले. नुकतेच फेब्रुवारीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधीर पारवे यांच्या उपस्थितीत वृद्धाश्रम आणि ॲम्बुलन्स सेवाश्रमाचे उद्‌घाटन झाले. अनेक तरुणांनी एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी हा सेवाधर्म सुरू केला. तीन महिने उलटले. आतापर्यंत शेकडो रुग्णांना ॲम्बुलन्सचा लाभ देण्यात आला. याशिवाय वृद्धांची नोंदणी सुरू झाली. लवकरच येथे निराश्रित वृद्धांना आधार देण्यात येणार होता. परंतु, वादळ आले आणि इमारतीवरील टिनाचे सर्व शेड उडून गेले. ३० वृद्धांचा आधार कोसळला. मात्र, दानशूर व्यक्तींकडून मिळणाऱ्या दानातून लवकरच छताची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी मदतीचे आवाहन नरेंद्र मोहतकर, राजेंद्र देशमुख, किशोर शर्मा, गजानन मुळे, अमोल सोळंकी, अक्षय मुळे यांनी केले आहे. 

Web Title: nagpur news rain senior citizen