वायफळ बडबड हाच दिग्विजयसिंहांचा उद्योग - रामदेव बाबा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

नागपूर - कॉंग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांचे देशासाठी कुठलेच योगदान नाही. दिवसभर वायफळ बडबड करणे आणि स्वतःचे हसे करून घेणे, हाच त्यांचा एकमेव उद्योग असल्याचा आरोप योगगुरू रामदेव बाबा यांनी केला. 

अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील 14 ढोंगी बाबांची यादी जाहीर केली. त्यात बाबा रामदेव यांचे नाव का नाही, अशी विचारणा दिग्विजयसिंह यांनी केली होती. या प्रश्‍नावर दिग्विजयसिंह यांची माझ्यावर आरोप करण्याची लायकी नाही. मी देशासाठी काम करतो. अशा लोकांना आपण फारसे महत्त्व देत नसल्याचे रामदेव बाबा म्हणाले. पतंजलीच्या वितरकांच्या बैठकीसाठी ते नागपुरात आले होते. 

राम रहीमसारख्या ढोंगी बाबांमुळे संपूर्ण संस्कृती बदनाम होत आहे. चुकीचे कार्य करणाऱ्यांवर कठोर करवाई झालीच पाहिजे. अवडंबर, चमत्कार व अंधविश्‍वास पाळणाऱ्या लोकांना बाबा समजू नये, असे आवाहनही त्यांनी केले. कॉंग्रेसच्या राजवटीत "पतंजली'चे उत्पादन सुरू झाले होते. याकरिता कॉंग्रेसने सहकार्य केले होते. आता भाजपच्या काळातही सरकारचे चांगले सहकार्य मिळत आहे असे सांगताना मी सरकारी साधू नाही. माझा गणवेश खादीचा असतो. तर पायात लाकडी खडावा असतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

"पतंजली'च्या उत्पादनाचा दर्जा चांगला आहे. इतरांपेक्षा स्वस्त आहे. यामुळे ग्राहकांची संख्या वाढली आहे. पुढील महिन्यात "मिहान'मध्ये उत्पादन सुरू होणार आहे. पुढील वर्षी दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून फळप्रक्रिया उद्योगही सुरू केला जाईल. पुढील मोसमापासून नागपुरी संत्र्यापासून विविध पदार्थांच्या उत्पादनाला सुरवात होणार असल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले.

Web Title: nagpur news ramdev baba Digvijay Singh