कारागृहातून सुटताच पुन्हा बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

नागपूर - शहरातील बांगलादेश वस्तीतील १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांपूर्वी गुंडाने लैंगिक अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीस अटक केली. जामिनावर सुटल्यानंतर गुंडाने पुन्हा त्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी तक्रारीवरून अंकुश गणेश बोकडेला (२५) अटक केली.

एकाच वस्तीत राहत असल्याने पीडित व अंकुश एकमेकांना ओळखत होते. अंकुशने पीडितेशी मैत्री केली व भीती दाखवून शारीरिक शोषण करू लागला. फेब्रुवारी महिन्यात पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अंकुशला अटक केली. पोलिस कोठडीनंतर त्याची कारागृहात रवानगी केली. १८ जुलैला तो जामिनावर बाहेर आला. २० जुलैला त्याने पीडितेसह आईवडिलांना मारण्याची धमकी देऊन घरी नेले. अंकुश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, तिच्या मनात त्याची भीती होती.

२० ते २८ जुलैदरम्यान अंकुश तिला घरी बोलावून लैंगिक शोषण करीत होता. पुन्हा पकडल्या गेल्यास कारागृहातून सुटताच कुटुंबाला संपविण्याची धमकी देत होता. पीडितेच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळाली. पीडितेने पोलिसांच्या चाईल्ड हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून मदत मागितली. चाईल्ड हेल्पलाइनच्या कर्मचाऱ्यांनी पीडितेची भेट घेतली. तिला विश्‍वासात घेऊन पाचपावली ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी पुन्हा अंकुश विरोधात गुन्हा नोंदवून अटक  केली. न्यायालयातून त्याची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

कुटुंबीयांना धमकी
अंकुश कारागृहात असताना गुंड सहकारी पीडितेच्या कुटुंबीयांना धमकवायला घरी यायचे. जामिनावर बाहेर येताच अंकुशने पीडितेच्या कुटुंबीयांना त्रास देणे सुरू केले. जामिनासाठी लागलेला खर्च द्या, अन्यथा माझ्या पद्धतीने रक्कम मुलीकडून वसूल करील, असा दम  कुटुंबीयांना दिला. परत पोलिसांत तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. पीडितेचा परिवार रक्कम देण्यास असमर्थ होते. याचा फायदा उचलत आरोपी ८-१० दिवसांपासून रोज रात्री १०-११ वाजता पीडितेला सोबत घेऊन जायचा. रात्रभर हैवानियतचा कळस गाठून दुसऱ्या दिवशी सोडायचा.

Web Title: nagpur news rape case crime