नागपूर: भावी पत्नीवर बलात्कार; पतीविरूद्ध गुन्हा

अनिल कांबळे
बुधवार, 21 मार्च 2018

पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी विपीन कुंभारे (वय 28, रा. माळगी, तुमसर, जि. भंडारा) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

नागपूर : साक्षगंध झाल्यानंतर वाग्दत्त वधूवर होणाऱ्या पतीने बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. संबंधासाठी वारंवार तगादा लावला. युवतीने नकार दिल्यामुळे बदनामी करण्याची धमकी दिली. यामुळे युवतीने होणाऱ्या पतीविरूद्ध बलात्काराची तक्रार दिली.

पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी विपीन कुंभारे (वय 28, रा. माळगी, तुमसर, जि. भंडारा) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: Nagpur news rape case in Nagpur