आरटीई प्रक्रिया बोगस; पालकांचा गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

नागपूर - आरटीई प्रवेशाच्या लॉटरीमध्ये कुठल्याही प्रकारची पारदर्शकता नसल्याचा आरोप करीत पालकांनी प्रवेश प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे. पाल्यांना प्रथम क्रमांकाची शाळा न मिळाल्यामुळे पहिल्या लॉटरीतील पाच हजार 357 विद्यार्थ्यांपैकी केवळ दीड हजार मुलांनीच प्रवेश घेतला. तसेच पालकांनी शिक्षण विभाग कार्यालयात प्रचंड गर्दी करीत गोंधळ घातला. 

आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेत 12 तारखेला लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यानंतर दसऱ्या दिवशीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. अनेकांचा क्रमांक लागूनही एसएमएस न मिळाल्याने नाराजी व्यक्‍त करण्यात आली. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाच्या कार्यालयात पालकांची गर्दी वाढली आहे. बऱ्याच पालकांनी आरटीई अर्ज केल्यामुळे पाल्यांचा इतर कुठल्याही शाळेत प्रवेश घेतला नाही. आता आरटीईमध्ये क्रमांक न लागल्याने इतर शाळांमध्ये प्रवेश मिळेल काय, हा प्रश्‍न आहे. 

दुसरीकडे काही विद्यार्थ्यांचा क्रमांक प्रथम पसंती दिलेल्या शाळेत न लागता, तिसऱ्या वा चौथ्या क्रमांकावर टाकलेल्या शाळेत लागला आहे. त्या शाळांमध्ये प्रवेश नाकारल्यास आरटीईची संधी हुकणार असल्याने त्यांच्यात नाराजी आहे. त्यामुळे पालक शाळा बदलवून देण्याचा आग्रह करीत आहेत. शनिवारी (ता. 17) अशा मागणीसाठी पालकांनी कार्यालयात गर्दी केली व अधिकाऱ्यांशी बाचाबाची करून गोंधळ घातला. 

अधिकाऱ्यांनी आरटीईही प्रवेश प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने झाली असल्याने त्यात कुठलाही घोळ नसल्याचे स्पष्टीकरण देत होते. मात्र, यावर पालकांचे समाधान होत नसल्याने पालकांनी गोंधळ घातला. अद्याप चार हजार जागा रिक्त असल्याने पालकांच्या आशा कायम आहे. 

Web Title: nagpur news RTE process bogus Confusion of Parents