पुल्लर प्रवेशद्वार बंद करणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नागपूर - उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांना जिप्सीची सक्ती आहे. मात्र, पुल्लर प्रवेशद्वाराजवळ ही सोयच नसल्याने हे प्रवेशद्वार बंद करण्याचा प्रस्ताव पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालकांकडे पाठविला आहे. त्यामुळे पुल्लर प्रवेशद्वार बंद होणार आहे. तसेच येथील प्रवेशशुल्कही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नागपूर - उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांना जिप्सीची सक्ती आहे. मात्र, पुल्लर प्रवेशद्वाराजवळ ही सोयच नसल्याने हे प्रवेशद्वार बंद करण्याचा प्रस्ताव पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालकांकडे पाठविला आहे. त्यामुळे पुल्लर प्रवेशद्वार बंद होणार आहे. तसेच येथील प्रवेशशुल्कही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

अभयारण्यातून जय हा वाघ गायब होणे, पर्यटन शुल्क आणि जिप्सीच्या सक्तीमुळे पर्यटकांच्या संख्येत घट झाली. पुल्लर गेटवरून जिप्सी उपलब्ध नसल्याने पर्यटकांना आल्यापावली परत फिरावे लागत  असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन हे  प्रवेशद्वार बंद करण्याचा तसेच प्रवेशशुल्क कमी करण्याचा निर्णय मुख्य वनसंरक्षकांनी घेतला आहे.  

आशियातील सगळ्यात मोठा वाघ म्हणून जय अल्पावधीतच ‘सेलिब्रिटी’ झाला. त्याला पाहण्यासाठी खऱ्या ‘सेलिब्रिटीं’सह पर्यटकांचा ओघ या अभयारण्याकडे वाढला होता. येथील गाइडनी वाघाच्या भोवतीच पर्यटन विकसित केले होते. वाघ दिसण्याची हमी येथील गाइड कायम देत होते. यामुळे पर्यटकही या अभयारण्याला आवर्जून भेट देऊ लागले होते. गेल्या वर्षी १८ एप्रिल २०१५ ला जय अखेरचा दिसला. तेव्हापासून अभयारण्याचे आकर्षण कमी झाले. पर्यटकांचा ओढा वाढलेला लक्षात आल्याने तत्कालीन मुख्य वनसंरक्षकांनी तडकाफडकी निर्णय घेऊन जंगल भ्रमणासाठी जिप्सीची सक्ती केली आणि पर्यटकांवर १८०० रुपयांचा अधिकचा भुर्दंड वाढला. त्यानंतरच पर्यटकांच्या संख्येत घट होऊ लागली. 

जिप्सीच्या सक्तीनंतर प्रवेशशुल्कात प्रतिव्यक्ती १०० रुपयांची वाढ केली होती. परिणामी, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीच्या सुटीत फक्त २० टक्केच लोकांनी या अभयारण्याला भेट दिली. जिप्सीचे दर वाढविल्याने पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या फाउंडेशनला मिळणारे उत्पन्न वाढले  असले, तरी पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. गाइडही बेरोजगार झाले आहेत. आता पुल्लर  गेट बंद करण्यात येणार असल्याने येथील सहा गाइड बेरोजगार होणार आहेत. 

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील प्रवेश शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  पुल्लर प्रवेशद्वारही जिप्सी उपलब्ध नसल्याने बंद करण्याचा प्रस्ताव आला आहे. तेथील  पर्यटकांची क्षमता मुख्य अभयारण्याच्या प्रवेशद्वाराकडे वळविण्याचा प्रयत्न राहील.
- ऋषिकेश रंजन क्षेत्र संचालक, उमरेड कऱ्हांडला अभयारण्य

Web Title: nagpur news sakal news impact