'युवकांना उद्योगांकडे वळविण्यासाठी प्रयत्नशील'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

नागपूर - पवार समाजातील विविध प्रश्‍नांवर कार्य करण्यासाठी समाजाच्या विविध ठिकाणी १६ संघटना कार्यरत होत्या. परंतु, या संघटनांचे कार्य मर्यादित राहत असल्याने, आम्ही सर्व संघटनांना एकत्रित आणून, पवार समाज कृती समितीची स्थापना केली आहे. या समितीमार्फत आम्ही समाजातील नव्या पिढीला उद्योगशीलतेकडे वळविण्यासाठी कार्य करीत आहोत, अशी माहिती सकाळ संवादमध्ये सहभागी झालेल्या पवार समाज कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. 

नागपूर सकाळच्या शहर कार्यालयात शनिवारी आयोजित सकाळ संवाद कार्यक्रमात पवार समाज संघटनेतील पवार समाज संघटनेचे पदाधिकारी रमेश विश्राम टेंभरे, डॉ. रामदेव दयाराम राऊत, पृथ्वीराज रहांगडाले, राजेंद्र सिंह श्रीराम ठाकूर, सुरेश टेंभरे, शिवकुमार पारधी, पुनाराम गौतम, जियालाल शरणागत, एस. एम. पारधी, श्रावण फरकाडे, मधुकर चोपडे, किसना देवासे, मनोज चव्हाण सहभागी झाले होते. पदाधिकाऱ्यांनी पवार समाजाची आजची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली. नागपूर जिल्ह्यात पवार समाजाची लोकसंख्या सुमारे तीन लाख असून, सर्व समाजबांधवाना एकत्रित आणण्याचे कार्य समितीच्या माध्यमातून होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. एमआयडीसी भागात समाजाचे लोक मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. औद्योगिक कामगार कायद्यानुसार मोबदला मिळत नसल्याने, त्याविरोधात गेल्या वीस वर्षांपासून लढा देत आहोत. समाजातील महिलांच्या सबलीकरणासाठी आणि उद्योगात महिलांची संख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे पदाधिकारी म्हणाले. 

महिला उद्योजकांना अर्थसाहाय्य मिळावे 
ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात सर्वांत अधिक वाटा पवार समाजाचा असून, आम्हाला ओबीसी जातप्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे पदाधिकारी म्हणाले. याशिवाय समाजाला सांस्कृतिक भवनाची जागा द्यावी, विद्यार्थिगृहाला मंजुरी द्यावी, महिला उद्योजकांना बळ देण्यासाठी अर्थसाहाय्य मिळावे इत्यादी प्रलंबित मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले. 

पवार शब्द वगळल्याने नुकसान
पवार शब्द वगळल्याने, समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पवार शब्द वगळल्यामुळे ओबीसीचे प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत आहेत. यासाठी प्रशासकीय स्तरावर आम्ही लढा देत आहोत. समितीच्या माध्यमातून युवकांसाठी उद्योग मेळावा आयोजित करून, तरुणांना उद्योगाकडे वळविण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे, असे पदाधिकारी म्हणाले. 

Web Title: nagpur news sakal samvad youth business