रिश्‍ता वहीं सोच नई...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

नागपूर - संक्रांतीला वाण देण्याची पद्धत खूप जुनी असली. पूर्वी भांडीकुंडी वाणात दिली जात होती. जमाना बदलला तसा साहित्यही बदलत आहेत. त्यामुळे महिलांची संक्रांतही ट्रेंडी होत चालली आहे. खरेदीसाठी मिळणारा अपुरा वेळ आणि नावीन्यपूर्ण भेटवस्तूंसाठी ऑनलाइन वाणाची होम डिलिव्हरी घेण्याचा स्मार्ट पर्याय महिलांनी निवडला आहे. 

दरवर्षी नवा ट्रेंड संक्रांतीच्या अत्याधुनिक वाणाच्या माध्यमातून प्रचलित होऊ लागला आहे. आधीच्या करंड्याची जागा आता वेगवेगळ्या वस्तूंनी घेतल्याने महिलांच्या बदलत्या आवडीनिवडीनुसार आता वाण देण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंमध्ये विविध प्रकार बाजारात आले आहेत. त्यात ज्वेलरी बॉक्‍स, छोट्या पर्सेस, लिपस्टिकस्‌, मोबाईल कव्हर या प्रकारच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. आपला खप वाढविण्यासाठी अनेक वेबसाईट्‌सनी मकरसंक्रांत गिफ्ट असा नवा विभाग सुरू केला आहे. 

प्रत्येक वस्तूंवर सवलत जाहीर करण्यात आली आहे. वाण वस्तू खरेदी करताना मोठ्या प्रमाणात घेतल्या जात असल्याने त्यानुसार सहा, आठ, बारा अशा वस्तूंच्या पॅकेजवर खास सवलत मिळत आहे. 

मकरसंक्रांतीपासून सुरू होणाऱ्या हळदीकुंकू आणि तिळगूळ समारंभांसाठी महिलावर्गाची घरोघरी तयारी सुरू झाली आहे. बाजारात मिळणाऱ्या ठरावीक वस्तूंपेक्षा ऑनलाइन वेबसाइट्‌सवर मिळणाऱ्या डेकोरेटिव्ह बॅग्स, पेपर क्विलिंगचे दागिने, नक्षीदार ज्वेलरी बॉक्‍स आदी नावीन्यपूर्ण पॅकेज वस्तूंना वाणासाठी पसंती मिळत आहे.

कामानिमित्त दहा तास घराबाहेर जात असल्याने, कौटुंबिक जबाबदाऱ्यांना पुरेसा वेळ देता येत नाही. गेल्या वर्षापासून संक्रांतीच्या वानासाठी मी ऑनलाइन शॉपिंगचा पर्याय निवडला. विविध वेबसाइट्‌सवर भरभरून सूट मिळत असल्याने, बाजारात वेळ न घालविता जागेवरच खरेदी करता येते. यंदा ॲमेझॉनवरून लेडीज पर्सची ऑनलाइन खरेदी वानासाठी केली. 
- सरिता पोटोळे 

Web Title: nagpur news sankrant van