श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी मारला झिंग्यांवर ताव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

नागपूर - यजमान भारताविरुद्ध येत्या शुक्रवारपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी नागपुरात आलेल्या श्रीलंका क्रिकेट संघाने बुधवारी सायंकाळी एका हॉटेलमध्ये झिंग्यांवर ताव मारला. जवळपास दोन तासांच्या मुक्‍कामात लंकेच्या खेळाडूंनी शाकाहारी जेवणाशिवाय चायनीज व काँटिनेंटल डिशेसचीही चव चाखली. खेळाडूंनी जेवणाची स्तुतीदेखील केली. 

सकाळी दोन-अडीच तास जामठा स्टेडियमवर सराव केल्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू हॉटेलला परत गेले होते. काही तास विश्रांती घेतल्यानंतर संघातील कर्णधार दिनेश चंडीमल, एंजेलो मॅथ्यूजसह सर्व खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ लक्‍झरी बसने पोलिसांच्या ताफ्यासह सायंकाळी सातच्या  सुमारास वर्धा मार्गावरील (बिगबाजारजवळ) १० डाऊनिंग स्ट्रीट हॉटेलमध्ये दाखल झाले.  सर्वांनी त्यांच्या आवडीनुसार विविध डिशेसवर मस्तपैकी ताव मारला. विशेषत: स्वादिष्ट झिंग्यांची त्यांनी मागणी केली. याशिवाय चायनीज, काँटिनेंटल व शाकाहारी जेवणही घेतले. तसेच काहींनी नुडल्स, बटर चिकन, फिश, थाई करी, व्हेज माचो, फ्राईड राइसचीही त्यांनी मागणी केली. श्रीलंकेचे खेळाडू जवळपास दोन तास हॉटेलमध्ये होते. जेवण आटोपल्यानंतर रात्री नऊ वाजता सर्व जण मुक्‍कामी असलेल्या हॉटेलकडे निघून गेले.  

नागपूरची चव आवडली    
खेळाडूंना हॉटेलमधील स्वादिष्ट जेवण खूप आवडले. त्यांनी स्तुती केल्याचे हॉटेलचे व्यवस्थापक अनिरुद्ध धांडे यांनी ‘सकाळ’ला बोलताना सांगितले. ते म्हणाले, आम्ही ‘सी फूड’  तर नेहमीच खात असतो. त्यामुळे त्यांना वेगळे पदार्थ खायचे होते. विशेषत: कमी तेलाच्या पदार्थांची त्यांनी मागणी केली. त्यांना आमच्या जेवणाचा स्वाद आवडला. तशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्याचे धांडे यांनी सांगितले. याआधीही या हॉटेलमध्ये धोनी, रैनी व अन्य खेळाडू जेवणासाठी आले होते.

Web Title: nagpur news Sri Lankan cricketers