आज काटोलमध्ये ‘संकोच कुणाचा’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

नागपूर - मासिक पाळी... समज कमी, गैरसमज जास्त असे प्रकार समाजात दिसून येतात. मासिक पाळी म्हणजे चारचौघांत न बोलण्याचा विषय.

केमिस्टवालाही सॅनिटरी नॅपकिन कागदात गुंडाळून देतो. ही लपवा-छपवी सुरू असताना दै. सकाळ, तनिष्का आणि राइज या संस्थेतर्फे  ‘संकोच कुणाचा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्‌घाटन सोहळा  मंगळवारी (ता. ९) काटोल येथे होईल. दुपारी ३ वाजता वर्ग ५ ते १० च्या मुलींना नगर परिषदेच्या शाळा क्रमांक तीनमध्ये अभियान राबविण्यात येईल. 

राइज संस्थेच्या गार्गी वैरागरे, डॉ. सुनीता महात्मे, डॉ. नूतन देव, सुरभी नय्यर यांच्यासह इतर सदस्यांच्या सहकार्यातून अडीचशेहून जास्त शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे, असे गौरी वैरागरे यांनी सांगितले. विशेष असे की, हे अभियान राबविताना प्रत्येक 

शाळेत विद्यार्थिनींशी चर्चा करण्यात येईल. चर्चेदरम्यान मासिक पाळी या विषयासोबतच पोर्न साईट तसेच पुरुषांकडून होणारा चांगला आणि वाईट स्पर्श यासंदर्भातील विषय हाताळण्यात येतील. ग्रामीण आणि शहरी भागात हे अभियान राबविताना प्रत्येक शाळांमध्ये एक प्रतिनिधी नेमून त्यांच्या माध्यमातून मुलींशी सातत्याने संवाद ठेवण्यात येईल. या संवादाला या अभियानाद्वारे मुक्त संवाद असे नाव देण्यात आले असून कानगोष्टीतूनही किशोरवयीन मुलींना तिच्या भविष्यासाठी आवश्‍यक ज्ञान देऊन सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे डॉ. सुनीता महात्मे म्हणाल्या.

Web Title: nagpur news ssankoch kunacha program