दोन मिनिटांनी मोठी निष्ठा टक्‍क्‍यांनीही पुढेच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

नागपूर - बालपणापासून प्रत्येक गोष्ट अगदी सोबतच करणाऱ्या निष्ठा आणि तन्वी दाणी या जुळ्या बहिणींनी दहावीमध्येही ती साथ कायम ठेवत प्रावीण्य श्रेणी पटकाविली. शाळेतील काही उपक्रम असो वा अभ्यास दोघींनी सोबतच करायचा, हे आधीपासूनच ठरलेले. नखशिखांत साम्य असलेल्या निष्ठा आणि तन्वीमध्ये अवघ्या दोन मिनिटांचा फरक आहे. दोन मिनिटांनी मोठी असलेल्या निष्ठाने दहावीच्या निकालातही २ टक्‍क्‍यांनीच तन्वीवर आपला थोरलेपणा टिकवला. 

सोमलवार निकालस स्कूलच्या विद्यार्थिनी असलेल्या निष्ठाने एकूण ५०० गुणांपैकी ४७८ गुणांसह ९५.६ टक्‍क्‍यांची कमाई केली. तर तन्वीने ५०० पैकी ४६८ गुणांसह ९३.६ टक्के गुण पटकाविले. दोघांच्या जन्मात दोन मिनिटांचा फरक असलेल्या या जुळ्या बहिणींनी दहावीच्या गुणांमध्येही दोन टक्‍क्‍यांच्या फरक राखण्याचा योगायोग साधला. निष्ठा आणि तन्वीचे वडील असंग दाणी हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत, तर आई मीनाक्षी दाणी या डॉक्‍टर आहेत. लहानपणापासून दोघींनी प्रत्येक यश सोबतच मिळविले. चौथ्या आणि सातव्या वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रावीण्य असो किंवा ‘नासा’च्या प्रोजेक्‍टमध्ये आंतरराष्ट्रीय शोधप्रबंध सादर करायचे असो; असे अनेक मोठे यश दोघींनी सोबतीनेच मिळविले असल्याचे डॉ. मीनाक्षी दाणी यांनी सांगितले. दोघींमध्ये अगदी दिसण्यापासून ते अनेक लहानसहान बाबींमध्ये कमालीचे साम्य आहे. काही चूक झाली तरी दोघी एकाच गोष्टीवर चुकतात. दोघींनाही गाण्याची आवड आहे व दोघी छान गाणे म्हणतात. तन्वीला हार्मोनिअम, कॅशीओ, पियानो वाजविण्याची आवड आहे. नेहमी सोबतच ठरवून अभ्यास करतात. एखादे वेळी कुणीही एकीने एकट्याने अभ्यास सुरू केल्यास त्यांच्यात वाद होतात, दोघींमधील अशा अनेक गमतीही डॉ. दाणी यांनी सांगितल्या. एवढे सारे असून त्यांच्यामध्ये समजूतदारपणा खूप आहे, त्यामुळेच दोघींना कधीही अभ्यासासाठी बोलावे लागले नाही. स्वत:चा व्यवस्थित अभ्यास स्वत:च केल्याने हे यश मिळविता आले, असेही त्या म्हणाल्या. निष्ठा आणि तन्वीला भविष्यात इंजिनिअर बनायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: nagpur news ssc result student Twin sisters