विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकांना ब्रेक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

नागपूर -  महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठांच्या विभागांमध्ये खुल्या निवडणुका घेण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार सर्व महाविद्यालये व विद्यापीठांच्या विभागांना निवडणुका घेणे बंधनकारक आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी निवडणुकांमुळे २३ वर्षांनंतर पुन्हा मारामाऱ्या, अपहरण, खून अशा घटनांना महाविद्यालयास सामोरे जावे लागेल, याची धास्ती महाविद्यालयांसह खुद्द राज्य शासनानेही घेतली. परिणामी यंदाच्या विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकांना शासनाकडून ब्रेक लावण्यात आला. दरम्यान, याविरुद्ध आता विद्यार्थी संघटनांनी रान पेटविले असून आंदोलनास सुरुवात केली.

महाविद्यालयातील निवडणुकांमध्ये विद्यार्थी संघटनांच्या आडून होणारा राजकारण्यांचा अतिरेकी हस्तक्षेप, गुंडागर्दी, मारामारी अशा घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्याने मध्ये या निवडणुका  बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर वर्गात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची वर्गप्रतिनिधी म्हणून निवड केली जाऊ लागली. या वर्गप्रतिनिधींमधून कॉलेज प्रतिनिधी निवडले जात होते. मात्र, आता या निवडी विद्यार्थ्यांच्या मतदानाने होणार असल्याचा धसका प्राचार्यांनी घेतला. त्यातूनच निवडणुका घ्यायच्या असल्यास महाविद्यालयाला पोलिस बंदोबस्त लावावा, अशी मागणी केली. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात या निवडणुका घेणे आवश्‍यक होते.  दोन महिने अभ्यासक्रम सोडून निवडणुकींचा गदारोळ, निवडणुकांची रणधुमाळी कशी निभावून न्यायची, असा यक्षप्रश्‍न प्राचार्यांसह प्रशासनाला सतावल्याने विद्यार्थी संघाच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. शासनानेही त्यावर कुठलाही निर्णय न दिल्याने महाविद्यालयाचे चांगलेच फावले. विशेष म्हणजे राज्याच्या निवडणुकांच्या काळात विद्यार्थी संघाच्या निवडणुका करण्याचे आश्‍वासन देत, कायद्यात त्याची तरतूदही केली. यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम जाणीवपूर्वक सरकारने केल्याने विद्यार्थी संघटनांमध्ये बऱ्याच प्रमाणात चीड निर्माण झाली आहे. आता संघटना त्याविरोधात आंदोलनाच्या तयारीत आहे.   

युवक काँग्रेसने जाळला तावडेंचा पुतळा
विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघाच्या निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतरही  त्याच्या अंमलबजावणीसाठी कुठल्याही प्रकारचे धोरण ठरविले नाही. याविरुद्ध प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल राऊत आणि अजित सिंह यांच्या नेतृत्वात विद्यापीठासमोर  शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा पुतळा जाळण्यात आला. या वेळी एनएसयूआयचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी राज्य सरकार आणि विनोद तावडे यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली.  

Web Title: nagpur news Student Representative Broke the Election