भाजप आमदाराच्या अंगरक्षकाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

नागपूर - आरमोरीचे भाजपचे आमदार कृष्णा गजबे यांचा अंगरक्षक भास्कर चौके याने वडसा देसाईगंज येथील जनसंपर्क कार्यालयात सर्व्हिस पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. 

नागपूर - आरमोरीचे भाजपचे आमदार कृष्णा गजबे यांचा अंगरक्षक भास्कर चौके याने वडसा देसाईगंज येथील जनसंपर्क कार्यालयात सर्व्हिस पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. 

चौके हा गेल्या दोन वर्षांपासून आमदार गजबे यांचा अंगरक्षक आहे. तो सध्या देसाईगंज येथेच राहतो. तेथे आमदार गजबे यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवार सकाळी सहा वाजता चौके जनसंपर्क कार्यालयात आला तेव्हा कार्यालय बंद होते. या कार्यालयासमोरच चौके याने सर्व्हिस पिस्तूलने डोक्‍यात गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज एकून समोर असलेल्या पेट्रोलपंपावरील कर्मचारी धावत आले. त्यांनी आमदार गजबे यांना माहिती दिली. जखमी अंगरक्षकाला रुग्णालयात दाखल केले. अंगरक्षकाची स्थिती पाहून डॉक्‍टरांनी गडचिरोली येथे नेण्यास सांगितले. आमदार गजबे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. गडचिरोलीला नेल्यानंतर डॉक्‍टरांनी अंगरक्षकाला मृत घोषित केले. अंगरक्षकाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. घरगुती वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी वडसा देसाईगंज पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

Web Title: nagpur news suicide crime