टाटा समूह उभारणार एव्हीएशन प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

नागपूर  - मिहान प्रकल्पात बोईंग-एअर इंडियाचे विमान देखभाल दुरुस्ती केंद्र, अंबानी एव्हेएशन उद्योगाबरोबरच टाटा उद्योग समूहही एव्हीएशन क्षेत्रातील मोठा प्रकल्प येत्या काळात सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नागपूर  - मिहान प्रकल्पात बोईंग-एअर इंडियाचे विमान देखभाल दुरुस्ती केंद्र, अंबानी एव्हेएशन उद्योगाबरोबरच टाटा उद्योग समूहही एव्हीएशन क्षेत्रातील मोठा प्रकल्प येत्या काळात सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात रविवारी कोल्ड स्टोरेजचच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार समीर मेघे, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, मिहानचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष सुरेश काकाणी, विमानतळाचे संचालक एस. व्ही. मुळेकर, यूएस एन्टरप्राजेसचे उल्हास मोहिले, प्रसाद वैशंपायन, अभिजित फडणवीस होते.

देशात जीएसटी लागू झाल्यानंतर नागपूर देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने त्याचे महत्त्व  वाढले आहे. येथून मोठ्या प्रमाणात निर्यातीला प्राधान्य राहणार आहे. त्यादृष्टीने नागपूर  आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. बांधकामाच्या दृष्टीने आवश्‍यक त्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. एव्हीऐशन क्षेत्रात बोईगएमआरओ, अंबानी एव्हीऐशन उद्योगांबरोबरच टाटा सोबत चर्चा सुरू आहे. येत्या काळात मोठा प्रकल्प मिहानमध्ये सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, गुंतवणूक किती करणार हे त्यांनी सांगणे टाळले.

मिहान येथे रामदेवबाबा यांच्या फळप्रक्रिया उद्योगासोबतच इतरही उद्योगांनी उद्योग सुरू करण्याची दर्शविली आहे. फळप्रक्रिया उद्योगाच्या निर्यातीसाठी शीतगृह साखळीची मागणी लक्षात घेता ही कोल स्टोरेजची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भविष्यात यापेक्षा मोठे शीतगृहाची आवश्‍यकता भासणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोद्दार, संजय भेंडे, विमानतळ प्राधिकरणाचे अबिद रुही, मिहानचे तांत्रिक संचालक एस. व्ही. चहांदे, एस. के. चॅटर्जी होते. 

निर्यातीसाठी मिहान महत्त्वाचे केंद्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ व कार्गो हबच्या अत्याधुनिक बांधकामाला शासनाने मान्यता दिली आहे. यात अद्ययावत विमानतळ, कार्गो टर्मिनल, नवीन रन वे तयार केला जाणार आहे. निर्यातीसाठी कोल्ड स्टोरेजची गरज लक्षात घेऊन लॉजेस्टीक पार्क उभारण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील निर्यातीसाठी मिहान हे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

Web Title: nagpur news tata group Aviation Project