महापौरांच्या प्रभागातच तीन लाखांची मर्यादा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

नागपूर - महापौर निधीतून महापौर नंदा जिचकार यांनी आपल्याच प्रभागात सर्वाधिक एक कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे. यामुळे कॉंग्रेस तसेच इतर प्रभागांचे नगरसेवक चांगलेच संतापले आहेत. विशेष म्हणजे महापौरांच्या प्रभागात निधी वाटप करताना तीन लाखांची मर्यादा पाळण्यात आली आहे. यामुळे संबंधित कामांसाठी निविदा काढण्याची गरज नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

महापौरांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात राखीव असतो. महापौरांच्या इच्छेनुसार तो वाटप केला जातो. त्यामुळे सहाजिकच महापौरांनी निधी वाटप करताना आपल्याच प्रभागाला प्राधान्य दिले आहे. यात काही आक्षेप घेण्यासारखे नसले तरी स्वतःच्या प्रभागात निधी वाटप करताना तीन लाखांच्या कामांना प्राधान्य दिले आहे. इतरांना तीन लाखांच्यावरचा निधी दिल्याने या सर्व कामांसाठी निविदा काढाव्या लागणार आहेत. यावर कॉंग्रेसच्या नगरसेवकांचा आक्षेप आहे. हा निव्वळ योगायोग असल्याचे म्हणता येणार नाही. कुठल्यातरी कंत्राटादाराच्या सल्ल्यानुसारच निधी वाटप करताना याची जाणीव ठेवण्यात आली असल्याचे बोलले जाते. या संदर्भात मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत हा विषय उपस्थित करून याकडे लक्ष वेधण्यात येणार होते. मात्र, गोंधळामुळे या विषयावर चर्चा होऊ शकली नाही. मात्र, महापौरांनी वाटप केलेल्या तीन लाखांच्या आतील आणि तीन लाखांच्या वरच्या कामांच्या पत्राची महापालिकेच्या वर्तुळात मात्र खमंग चर्चा आहे. 

महापौरांकडे पाच कोटी रुपयांच्या निधी वाटपाचा अधिकार असतो. तो आवश्‍यकतेनुसार वाटप केला जातो. त्यात भेदभाव करण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नाही. ज्या नगरसेवकांनी सादर केलेल्या संबंधित कामाच्या इस्टिमेटनुसार निधी वाटप करण्यात आला आहे. याचा वेगळा अर्थ काढून राजकारण करण्याचा कोणाचा तरी हेतू दिसतो, असे महापौरांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. 

Web Title: nagpur news Three lakh limit for the Mayor Fund