वेदमूर्ती सागर शर्मा यांना सिंघल वैदिक पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

नागपूर - विश्‍व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या स्मरणार्थ सिंघल फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय वैदिक पुरस्कार वेदमूर्ती सागर शर्मा यांना प्रदान करण्यात आला. 

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच गोविंदगिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. सागर शर्मा यांची संपूर्ण भारतातून वेदमूर्ती म्हणून पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ते सध्या महाल येथील भोसला वेदशास्त्र महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत आहेत. सागर शर्मा मूळचे औरंगाबादचे. 

आळंदीतील निजानंद वेद पाठशाळेत त्यांनी यजुर्वेद माध्यंदिन शाखेतील संहितेचे अध्ययन पूर्ण केले. 

त्यानंतर भोसला वेदशास्त्र महाविद्यालयात वेदमूर्ती गोविंद पत्राळे गुरुजींकडे पद, क्रम, जटा, घन, शतपथ ब्राह्मण, याज्ञवल्क्‍य शिक्षा तसेच प्रातिशाख्याचे अध्ययन पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कांचीपीठ, श्रुंगेरीपीठ, अवधूतपीठ म्हैसूर व वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे येथील घनांत परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण केल्या.

Web Title: nagpur news VHP mohan bhagwat Singhal Vedic Award