दीड तास विव्हळत पडली होती दृष्टी; मित्र गेले पळून...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नागपूर - कारवाईच्या भीतीने चारही मित्रांनी पळ काढल्याने दृष्टी मिलिंद सोनारकर (वय १९) तब्बल दीड तास विव्हळत पडली होती. एक मित्र तासाभराने परत आला. त्याने दृष्टीच्या वडिलांना फोन केला. यात बराच वेळ निघून गेला. दृष्टीला वेळीच उपचार मिळाले तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता. 

कार अपघातात दृष्टीचा मृत्यू

नागपूर - कारवाईच्या भीतीने चारही मित्रांनी पळ काढल्याने दृष्टी मिलिंद सोनारकर (वय १९) तब्बल दीड तास विव्हळत पडली होती. एक मित्र तासाभराने परत आला. त्याने दृष्टीच्या वडिलांना फोन केला. यात बराच वेळ निघून गेला. दृष्टीला वेळीच उपचार मिळाले तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता. 

कार अपघातात दृष्टीचा मृत्यू

बुधवारी रात्री मित्रांसोबत पार्टीला गेलेल्या दृष्टीचा मृत्यू झाला. परत येताना अंबाझरी उद्यानाजवळील एका विजेचा खांबाला त्यांच्या गाडीने जोरदार धडक दिली. सर्व मित्र ड्रंकन ड्राइव्हच्या कारवाईने पळून गेले. सहपोलिस निरीक्षक नैताम यांच्या माहितीनुसार, आरोपी कारचालक दर्शन उदय तिवारी (वय २०, उदयनगर, खामला) याचे वडील मोठे व्यवसायी आहेत. दर्शन आणि त्याचे मित्र राजेश पात्रीकर, तारक बडकस, अथर्व जोशी, आयुष खेडकर व त्याची मैत्रीण दृष्टी सोनारकर हे पार्टी करण्यासाठी कारने बाहेर गेले होते. त्यांनी फुटाळा तलावाजवळ मद्य प्राशन केले. कारचालक दर्शनला दारू चढली होती. तरीही त्याने कार चालविण्याचा आत्मविश्‍वास दाखविला. कॅम्पस चौकातून अंबाझरी गार्डन रोडने ते जात होते. भरधाव वेगाने जात असलेल्या कारवरील दर्शनचे नियंत्रण सुटले. ती अंबाझरी गार्डनसमोरील विद्युत खांबाला धडकली. प्रचंड वेगात असल्याने कार जवळपास १० फूट वर उडाली व एका खड्ड्यात आदळली. दर्शन आणि त्याचे सर्वच मित्र कारबाहेर निघाले. त्यांनी मोबाईलच्या टॉर्चने दृष्टीचा शोध घेतला. ती रक्‍तबंबाळ अवस्थेत विव्हळत होती. गुन्ह्यात अडकणार या भीतीमुळे सर्वांनीच पळ काढला. मात्र, काही वेळानंतर आयुष खेडकर पुन्हा अपघातस्थळी परतला. त्याने विव्हळत असलेल्या दृष्टीला पाणी पाजले. आयुषने दृष्टीच्या वडिलांना फोन केला. तासाभरातच तिचे वडील घटनास्थळावर पोहोचले. मुलीच्या मरणयातना पाहून त्यांच्या भावनेचा बांध सुटला. त्यांनी आयुषलाच जबाबदार धरले. दोघांनीही तत्काळ दृष्टीला तत्काळ रुग्णालयात दाखल केले नाही. प्रचंड रक्तस्राव झाल्याने तसेच हाडे मोडल्याने दृष्टीने घटनास्थळीच प्राण सोडला. 

Web Title: Nagpur news Vidarbha news accident drushti sonarkar