'व्हॅलेंटाइन डे'ला नगरसेविकेने पतीला चोपले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

नागपूर - 'व्हॅलेंटाइन डे'ला नागपुरातील एका नगरसेविकेच्या पतीला दुसऱ्या महिलेवर प्रेम व्यक्त करण्याचे धारिष्ट्य चांगलेच अंगलट आले. पती "वाकड्या वाटे'वर जात असल्याची कुणकुण नगरसेविका पत्नीला लागल्याबरोबर तिने पतीला चांगलेच चोपून काढले. ही घटना उघड झाल्यानंतर नागपूर महापालिकेत या मारहाणीची चर्चा चांगलीच रंगली होती.

ही नगरसेविका सत्तारूढ भाजपची आहे. व्हॅलेंटाइनदिनी पती एका महिलेशी फोनवर बोलत असल्याचे तिला समजले. त्या महिलेने नगरसेविकेच्या पतीला एका चौकात बोलाविले होते. घाईघाईने पती जात असल्याने, तसेच पतीच्या वर्तनाचा संशय आल्याने नगरसेविकेनेही त्याचा पाठलाग सुरू केला. थोडे दूर गेल्यानंतर पती एका महिलेशी बोलत असल्याचे दिसून आले. पतीने त्या महिलेला गुलाबपुष्प दिल्यानंतर अचानकपणे नगरसेविका "दत्त' म्हणून उभी राहिली. तिने पतीला जाब विचारला. उडावीउडवीची उत्तर दिल्यानंतर नगरसेविकेचे त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. तेथे बघ्यांची गर्दी जमा झाली. या गर्दीचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्नात असताना नगरसेविकेने त्या महिलेची वेणी पकडून तिलाही चपलेने चोप दिला.

अखेर त्या महिलेने "ताई, माझी चूक झाली' अशी कबुली देऊन सुटका करून घेतली. या प्रकाराची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली नाही. व्हॅलेंटाइन डेला झालेल्या या प्रकाराची महापालिका परिसरात मात्र आज दिवसभर चविष्टपणे चर्चा रंगली होती.

Web Title: nagpur news vidarbha news valentine day corporator beating husband crime