एका ‘क्‍लिक’वर मिळतील कपडे धुऊन, प्रेस करून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

नागपूर - कपडे धुणे आणि प्रेस करणे तसे कटकटीचेच काम. मात्र, ते टाळताही येत नाही. मात्र, आता चिंता करण्याची गरज नाही. केवळ एका क्‍लिकवर कपडे धुऊन आणि प्रेस करून मिळणार आहेत. फॉरेन्सिक सायन्सच्या सहा विद्यार्थ्यांनी ‘ई-वॉशर’ नावाचे नवे ‘ॲप’  आणि संकेतस्थळ तयार केले आहे. ज्यामुळे कपडे धुऊन आणि प्रेस करून अगदी वेळेत मिळतील. 

नागपूर - कपडे धुणे आणि प्रेस करणे तसे कटकटीचेच काम. मात्र, ते टाळताही येत नाही. मात्र, आता चिंता करण्याची गरज नाही. केवळ एका क्‍लिकवर कपडे धुऊन आणि प्रेस करून मिळणार आहेत. फॉरेन्सिक सायन्सच्या सहा विद्यार्थ्यांनी ‘ई-वॉशर’ नावाचे नवे ‘ॲप’  आणि संकेतस्थळ तयार केले आहे. ज्यामुळे कपडे धुऊन आणि प्रेस करून अगदी वेळेत मिळतील. 

कपडे धुणे हे काम म्हणजे सर्वच गृहिणींची डोकेदुखी. त्यामुळे या कामासाठी घरोघरी मोलकरीण लावण्यात येते. त्यानंतर वेळ येते ती, धुतलेले कपडे प्रेस करण्यासाठी घराजवळ असलेल्या ‘लॉन्ड्री’वाल्याकडे कपडे पाठविण्यात येतात. मात्र, अनेकदा प्रेसचे कपडे ‘लॉन्ड्री’वाल्याकडे गेल्यावर ते वेळेवर मिळतील, याची हमी नसते. त्यामुळे कधी-कधी वेळेवर आवश्‍यक कपडे मिळत नाही. शिवाय काही विशिष्ट कपड्यांसाठी ‘लॉन्ड्री’मध्ये कपडे दिल्यास त्यावर अधिकचे शुल्क आकारण्यात येते. या सर्व बाबींवर उपाय म्हणून शासकीय फॉरेन्सिक सायन्स महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या सहा विद्यार्थ्यांनी ‘स्टार्टअप’ म्हणून ‘ई-वॉशर’ नावाचे ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला. श्रीकांत अप्पाला, कौशिक बिस्वास, किशोर हरिणखेडे, शुभम ठाकरे, मुजम्मील खान, यश सेलोकर अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यांनी या विद्यार्थ्यांने निभावून दोन दिवसांपूर्वी ‘ॲप’माध्यमातून काम केले. यामध्ये ॲपवर ऑर्डर देताच, काही वेळाने घरी कपडे घेण्यासाठी मुलगा येईल. तो दोन-तीन दिवसाने दिलेल्या वेळेवर कपडे परत करेल. त्या बदल्यात त्याला रेटकार्डनुसार आकारण्यात येणारे पैसे द्यावे लागतील. 

विशेष म्हणजे दोन दिवसांत दहापेक्षा अधिक नागरिकांनी त्यांना ‘ॲप’वरून ऑर्डर दिले आहे. यासाठी आकारण्यात येणारे दर सामान्य ‘लॉन्ड्री’पेक्षाही कमी आहे. ड्राय क्‍लिनही करून देण्यात येणार आहे. www.ewasher.in  या नावाने संकेतस्थळही तयार केले असून त्याद्वारे ऑर्डर देता येणार आहे. 

नवे ग्राहक दिल्यास मिळेल सवलत
ई-वॉशर ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यासदंर्भात माहिती देत, नवे ग्राहक दिल्यास पहिल्या ग्राहकाला दहा टक्‍क्‍यापर्यंत सवलत मिळणार आहे. विशेष म्हणजे दररोज एक ऑफरही ॲपमध्ये देण्यात येणार आहे. 

Web Title: nagpur news Wash clothes and press on a click