नामांतर आंदोलनातील महिलांच्या लढ्याचा नवा अध्याय

नामांतर आंदोलनातील महिलांच्या लढ्याचा नवा अध्याय

नागपूर - औरंगाबादेतील मराठवाडा विद्यापीठाच्या बॅनरवर १४ जानेवारी १९९४ रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ हे नाव कोरले गेले. हा ‘नामांतर’ लढा तब्बल १६ वर्षे चालला. या आंदोलनात आंबेडकरी विचारांच्या पुरुषांसोबत महिला कार्यकर्त्याही पुढे होत्या. त्यांनाही आंदोलनाची झळ सहन करावी लागली. आंदोलनात महिलांच्या सहभागाच्या नोंदी घेत नामांतर चळवळीच्या विजयी पानांचा इतिहास अमेरिकेतील एमेली हेस या संशोधकाच्या लेखणीतून पुढे येत आहे.

‘रमाई’ चळवळीच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नागपुरात आल्या असता त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. नामांतर आंदोलनाच्या इतिहासाचे वय ३५ वर्षांचे. २७ जुलै १९७८ मध्ये विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठराव संमत झाला. 

सरकारच्या निर्णयाला जातीचा रंग देत दलितांच्या घरांची राखरांगोळी करण्यास सुरुवात केली. बाबासाहेबांच्या समतेचा विचार नसानसांत रुजलेल्या कार्यकर्त्यांनी खेड्यातील बांधवांचे धगधगते मरणतांडव बघितले. यामुळे पेटून उठलेल्या कार्यकर्त्यांनी ४ ऑगस्ट रोजी डोक्‍याला निळे कफन बांधून नामांतरासाठी पहिला एल्गार पुकारला. नामांतराच्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला होत्या. परंतु, महिलांच्या त्याग या लढ्यातून पुढे आला नाही. नेमकी ही नोंद यांनी आपल्या संशोधनातून पुढे आणली.

प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वात ‘लाँगमार्च’मध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या. त्यांचाही इतिहास मिळवण्यासाठी एमिला प्रयत्नशील आहेत. सध्या ऐमिलाने २० महिलांशी संवाद साधला. त्यांच्या मुलाखती घेतल्या. 

आंदोलनातील महिलांची नावे घेतली. त्यांच्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून नामांतराच्या आंदोलनातील महिलांचे अढळ स्थान सांगून नामांतर आंदोलनातील नवा अध्याय समाजापुढे लवकरच येणार आहे. त्यांच्या या संशोधनात आंबेडकरी चळवळीतील डॉ. प्रदीप आगलावे, प्रा. सरोज आगलावे, डॉ. धनराज डहाट, छाया वानखेडे-गजभिये, ॲड. विमलसूर्य चिमणकर, सुनील सारिपुत्त, छाया खोब्रागडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com