लठ्ठपणा कमी करताहेत महिला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

नागपूर - सकाळ मधुरांगणच्या वेटलॉस शिबिरात दररोज शेकडो महिला सहभागी होत आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. सुप्रसिद्ध प्राकृतिक चिकित्सक, सुजोक थेरपिस्ट डॉ. आभा जैन यांच्याकडून लठ्ठपणावर आवर घालण्यासाठी तसेच वजन नियंत्रित ठेवण्यासाठी टिप्स घेत आहेत. 

नागपूर - सकाळ मधुरांगणच्या वेटलॉस शिबिरात दररोज शेकडो महिला सहभागी होत आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. सुप्रसिद्ध प्राकृतिक चिकित्सक, सुजोक थेरपिस्ट डॉ. आभा जैन यांच्याकडून लठ्ठपणावर आवर घालण्यासाठी तसेच वजन नियंत्रित ठेवण्यासाठी टिप्स घेत आहेत. 

सकाळ मधुरांगण, प्लॅटफॉर्म नं. १, ऑर्ची, नियारा व रुवा यांच्या वतीने बजाजनगर येथील ‘विष्णुजी की रसोई’ येथे पाच जुलैपासून शिबिर सुरू आहे. शिबिर १२ जुलैपर्यंत सकाळी ६ ते ७, ७ ते ८ आणि ८ ते ९ या वेळेत घेण्यात येते. या उपक्रमासाठी जेसीआय नागपूर रॉयलचे सहकार्य लाभले आहे. शिबिरात ॲरोबिक, योगा, श्‍वासाचे नियंत्रण, बॉडी ॲनालिसिस, लो कॅलरी डाएट रेसिपी, वॉटर थेरपी, ॲक्‍युप्रेशर, सुजोक थेरपी, ध्यान, क्‍लॅपिंग थेरपी, आहार मार्गदर्शन, आहार आणि स्वभाव आदींवर मार्गदर्शन केले जात आहे. लठ्ठपणाशिवाय ॲसिडीटी, दमा, रक्तदाब, मायग्रेन, कंबरदुखी, अनिद्रा, मधुमेह, स्त्रीरोग यांसोबत शारीरिक-मानसिक व्याधींचे निवारण करण्यात येत आहे. मधुरांगणच्या सदस्यांसाठी प्रवेश नि:शुल्क असून, इतरांसाठी शंभर रुपये शुल्क आहे. इच्छुकांनी नोंदणीसाठी सकाळ शहर कार्यालय, २७४/१, वर्धा हाउस, सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ येथे प्रत्यक्ष अथवा हर्षाली दगडे (९५२७००४४५६), शुभम काथवटे (९८८१२४३६८१) यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधावा.

शिबिरात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होत आहेत. त्यांना शिकविण्यात आनंद मिळतो. लठ्ठपणा आणि वाढत्या वजनामुळे अनेक समस्या निर्माण होतात. वेगवेगळ्या आजारांनाही तोंड द्यावे लागते. महिलांनी तत्काळ वजन नियंत्रित करण्यासाठी पावले उचलावी.

डॉ. आभा जैन,  प्राकृतिक चिकित्सक व सुजोक थेरपिस्ट 

मधुरांगणची नोंदणी सुरू
वेटलॉस शिबिरात मधुरांगणच्या सदस्यत्वाची नोंदणी केली जात आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा. मधुरांगण सदस्यांसाठी वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. वेगवेगळ्या स्पर्धांसोबतच महिलांना आपले कला-कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठसुद्धा उपलब्ध करून दिले जाते. याशिवाय सदस्यांना आकर्षक पुरस्कार दिले जातात.

Web Title: nagpur news women obese