झेडपीच्या शाळांमध्ये ‘बायोमॅट्रिक’ हजेरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

नागपूर - जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यासाठी बायोमॅट्रिक मशीनचा उपयोग करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये या प्रकल्पासाठी जवळपास चार कोटी वीस लाखांचा निधी देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २५ टक्के शाळांमध्ये बायोमॅट्रिक पद्धती लावण्यात येणार आहे. 

जिल्हा परिषदेमध्ये १ हजार ५३३ शाळांचा समावेश आहे. यामध्ये जवळपास दहा ते पंधरा हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. यापैकी काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, असे असताना, बऱ्याच शाळांमध्ये ती संख्या वाढवून सांगण्याचे शिक्षकांद्वारे केले जाते. अनेकदा याचा फायदा शिक्षक घेताना दिसून येतात. याशिवाय बोगस हजेरी दाखविण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत सर्वच शाळांमध्ये बायोमॅट्रिक मशीन लावण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून जवळपास ४ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे यासाठी ‘व्हर्सेटाइल’ या कंपनीला कंत्राटही देण्यात आले आहे. या कंपनीद्वारे मशीनचा पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेने एका महिन्यात जिल्ह्यातील २५ टक्के शाळांमध्ये बायोमॅट्रिक मशीन लावण्याचे लक्ष ठरविले आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने इतर शाळांमध्ये बायोमॅट्रिक मशीन लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा संपल्यावर, नगर परिषद आणि  महापालिकेसह शहर आणि जिल्ह्यातील खासगी शाळांमध्येही बायोमॅट्रिक मशीन लावण्याचा शासनाचा मानस आहे.

एक वर्षापूर्वीच घोषणा
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बायोमॅट्रिक मशीन लावण्याची घोषणा करण्यात आली. त्याचे  कंत्राट ‘व्हर्सेटाइल’ला देत, जिल्ह्यातील तीन ब्लॉकमध्ये हे मशीन लावण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही अद्याप या शाळांमध्ये बायोमॅट्रिक लागले नाही. त्यामुळे २५ टक्के जिल्हा परिषद शाळांमध्ये बायोमॅट्रिक मशीन लावण्याचे लक्ष खरोखरच पूर्ण होणार काय? याबद्दल शाशंकता आहे. 

अनुदान होणार कमी 
शासनाकडून शाळांवर खर्ची होणाऱ्या अनुदानात कपात करण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच शासनाकडून शाळांमध्ये बायोमॅट्रिक मशीन लावण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी प्रथम शासकीय आणि त्यानंतर खासगी शाळांमध्ये हे लावून त्यांच्या अनुदावर ‘टाच’ आणण्याचा डाव शासनाचा असल्याचे संस्थाचालकांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: nagpur news zp school biometric presenty