मनपा काढणार कचऱ्याचे तेल

File photo
File photo

नागपूर : भांडेवाडीत कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर महापालिकेने आता कचऱ्यातून बायो ऑइल, बायोचर निर्मिती प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. दररोज 5 टन कचऱ्यावर प्रक्रियेचा प्रकल्प भांडेवाडी येथे तयार करण्यात येणार असून, खासगी कंपनीला यासाठी एक एकर जागा देण्यात येणार आहे.
महापालिकेने कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्पाचे कंत्राट एस्सल ग्रुपला दिले आहे. शहरात सध्या दररोज 1100 टन कचरा गोळा होता. या वीजनिर्मिती प्रकल्पात दररोज 800 टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे दररोज 300 टन कचरा शिल्लक राहणार आहे. या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न कायम होता. यातील आता दररोज पाच टन कचऱ्यावर प्रक्रियेचा पर्याय महापालिकेने शोधून काढला. घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत हा प्रकल्प खासगी कंपनी तयार करणार असून, महापालिकेला एकही रुपया खर्च येणार नाही. शहरातील एनडीअर सेल्स या कंपनीने हा प्रकल्प स्वखर्चाने उभारण्यास तयारी दर्शविली असून, याचा विस्तृत आराखडा तयार करून महापालिकेलाही दाखविला. "नीरी'ने या प्रकल्पास मंजुरी दिली असून, महापालिकेने प्रकल्पास हिरवी झेंडी दाखविली. दररोज पाच टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून बायो ऑइल व बायोचरची निर्मिती करण्यात येईल. या उत्पादनांच्या विक्रीचे अधिकार प्रकल्प राबविणाऱ्या मेसर्स एनडीअर सेल्सकडे राहणार आहे. या प्रकल्पासाठी या एजन्सीला भांडेवाडी येथे 1 एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येथे पाच वर्षे प्रकल्प चालविल्यानंतर एजन्सी हा प्रकल्प महापालिकेला परत करणार, या अटीवर प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखविली. परंतु, या प्रकल्पासाठी खासगी एजन्सीला जागा देण्याचा प्रस्ताव येत्या 29 जानेवारीला महासभेत मंजुरीसाठी येणार आहे. महासभेच्या मंजुरीनंतर कचऱ्यातून बायो ऑइल व बायोचर प्रकल्पाचा मार्ग मोकळा होणार आहे.
800 टन कचऱ्यातून 11.5 मेगावॉट वीजनिर्मिती
या प्रकल्पामुळे महापालिकेची कचऱ्यावर प्रक्रियेची डोकेदुखी कमी होणार आहे. एस्सल ग्रुप दररोज 800 टन कचरा वीजनिर्मितीसाठी महापालिकेकडून घेणार आहे. या कचऱ्यातून 11.5 मेगावॉट वीजनिर्मिती होईल. ही वीज पारडी येथील उपकेंद्राला देण्यात येणार आहे. येथून ही वीज महावितरणकडे वळती केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com