आपली बस करणार प्रदूषणमुक्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

नागपूर : महापालिकेचे परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी आज परिवहन समितीचा 278 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्व 431 बसचे सीएनजीत रूपांतरण, 45 नव्या मिनी बसेस, खास महिलांसाठी पाच इलेक्‍ट्रिक बसेस तसेच शहिदांचा कुटुंबातील महिलांना "मी जिजाऊ' योजनेअंतर्गत मोफत बस प्रवासची घोषणा त्यांनी केली.

प्रवाशांच्या सुविधेसाठी येत्या वर्षात 236 स्टॅंर्डड बस, 150 मिडी, 45 मिनी अशा एकूण 431 बसेस कार्यान्वित करण्यात येणार आहेत. लवकरच 45 मिनी बसेस सेवेत दाखल होत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त हरित बससेवा करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सर्वच डिझेल बसेस सीएनजीमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत. वाठोडा आणि कोराडी येथे दोन बस डेपो विकसित केले जाणार आहेत. मेट्रो आणि बसने प्रवाशांना कॉमन मोबिलिटी कार्ड देण्यात येणार आहे. कार्डधारकांना मेट्रो रेल्वे आणि बसने प्रवास करता येणार आहे.
ठळक वैशिष्ट्ये
-सर्व बसेस सीएनजीवर करणार
-महिलांसाठी पाच इलेक्‍ट्रिक बसेस
-शहिदांच्या कुटुंबातील महिलांना मोफत प्रवास
-45 मिनी बसेस लवकरच दाखल होणार
-कोराडी आणि वाठोड्यात बस डेपो
-बस थांब्यांवर वॉटर एटीएम
-बंगळूरच्या धर्तीवर 116 स्थानकांची निर्मिती
-दिव्यांगांना शंभर टक्के सवलत
-भंगार बसेसमध्ये बायोबस टॉयलेट

Web Title: Nagpur NMC news